खेडले परमानंद येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
खेडले परमानंद प्रतिनिधी//
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
आज नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद सब सेंटर येथे पल्स पोलिओ बूथ चे उद्घाटन समाजसेवक पत्रकार संभाजी शिंदे यांच्या हस्ते बाळाला दोन थेंब पोलिओचे पाजून करण्यात आले.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी -डॉ भुसारी पी ई
आरोग्य सेविका- श्रीमती तमनर पी पी
आरोग्य सेवक - श्री पाटोळे आर आर
आशा सेविका - श्रीमती शिंदे वाय ए
परिचर- श्रीमती राजळे एस एस
ग्रामस्थ संतोष राजाळे ,शरद बर्डे,
माजी सरपंच विमल शिंदे,गायत्री शिंदे,आदींसह लाभार्थी बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी प्रसार माध्यम व प्रत्यक्ष भेटीद्वारे अथक परिश्रम घेतले.
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व पालकांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या बालकांना बुथवर घेऊन यावे व पोलिओ मुक्त भारत अभियानामध्ये आपले मोलाचे सहकार्य द्यावे.