राहुरी नगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे - मा. खा . लोखंडे

राहुरी नगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे - मा. खा . लोखंडे

राहुरी नगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी कामला लागावे.- मा.खा.लोखंडे

 

               रविवार दि.९ रोजी राहुरी येथे मा.खा.सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी राहुरी नगरपालिका निवडणूकित शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी बैठक संपन्न झाली.या बैठकीस शिवसेना अहिल्यानगर दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले,शिवसेना युवा नेते राजूभाऊ शेटे, शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे ,युवा सेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख शुभम वाघ,शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,यु.राहुरी शहर प्रमुख गंगाधर उंडे उपस्थित होते.

 

         याप्रसंगी प्रास्ताविक करतांना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी राहुरी शहरातील नगरपालिका वार्ड रचनेविषयी माहिती दिली.तसेच शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढवल्या जातील असे श्री.लांबे म्हणाले.

 

          या प्रसंगी शिवसेना नेते राजूभाऊ शेटे यांनी नगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण ताकातीनिशी पाठीशी उभे राहिले जाईल,सर्व सामान्य शिवसैनिकांनी तयारीला लागावे राहुरी नगरपालिकेत शिवसेनेचाच शिवसैनिक नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे असे श्री.शेटे म्हणाले.

 

           शेतकरी सेनेचे राज्यउपाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले कि, येणाऱ्या निवडणूक या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत.राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य शिवसैनिक हा शेतकरी आहे,आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुल हे नाम.एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्य्मातून राजकीय समीकरण हातात घेतील.

 

        शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले कि, राहुरी शहरात नगरपालिका निवडणुकीत हिंदुत्ववादी युवकांना संधी दिली जाईल.शिवसेना पक्षाला महायुतीमध्ये विचारात न घेतल्यास सर्व जागा लढविल्या जातील.शिवसैनिकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पूर्ण ताकद दिली जाईल.उमेदवारांना कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास माझ्याशी संपर्क साधा.शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा पक्ष आहे असे श्री.बाबुशेठ म्हणाले.

 

         अध्यक्षीय भाषणात मा.खा.सदाशिव लोखंडे म्हणाले कि,राहुरी    नगरपालिकेवर शिवसेना पक्षाचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.राहुरी शहराचा विकास करण्यासाठी नाम.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरवा केला जाईल.लाडक्या बहिणी निश्चित एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबान चिन्हाला प्रथम पसंती देवून नगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती देतील.राहुरी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेना नेते राजूभाऊ शेटे व तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्यावर असेल.सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे.महायुतीत सन्मानाने जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास शिवसैनिकांनी संपूर्ण ताकतीने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करावी असे मा.खा.लोखंडे म्हणाले.

            – शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेनेच्या समन्वयक पदी अशोक तनपुरे,तालुका प्रमुख बाप्पुसाहेब काळे तर शिवउद्योग शहर प्रमुख म्हणून नामदेव वांढेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी युवा सेना राहुरी तालुका प्रमुख ३२ गाव सचिन करपे यांची निवड करण्यात आली.

 

            या प्रसंगी रोहित नालकर,विजय उंडे,संदीप आढाव,गटप्रमुख सुभाष जुंदरे,टाकळीमिया शहर प्रमुख विजय तोडमल,अविनाश क्षिरसागर,अरुण निमसे,भाऊराव उंडे,नितीन तनपुरे,धनंजय गुलदगड,ईश्वर मासरे,उमेश कवाने,महेश घोरपडे,संदीप करपे,कुमार निमसे,प्रसाद कवाने,अमोल खंगले, ,मनोज बेलदार,कुमार निमसे,रोहित डहाळे,अमोल हारदे,संकेत कुमटकर, दीपक घावटे,शंकर आढाव,बाबासाहेब वांढेकर,महेंद्र गायकवाड,अमोल थोरात,योगेश फसले,मयूर कोल्हे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.आभार अड.भाऊसाहेब पवार यांनी मानले.