क्लासवन अधिकारी पदी अनिकेत आरोळे यांची निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.

क्लासवन अधिकारी पदी अनिकेत आरोळे यांची निवड झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सुखदेव आरोळे यांचा मुलगा अनिकेत आरोळे यांची प्रथम वर्ग अधिकारी पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, श्रेणी-१ गट-अ (Livestock Development Officer-Class 1-Grade A) पदी नुकतीच निवड झाली. 

     यानिमित्त बालाजी देडगाव येथे आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सलमान सोहळा पार पडला.

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक बाजीराव पाटील मुंगसे हे प्रमूख मान्यवर लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते मोहनराव पागिरे होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर तांबे यांनी केले.

      यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, मा. उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे, प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संभाजी काजळे, पोपट घुले, , शिवाजी लांघे, संजय मुंगसे, कुंडलिक कदम, किशोर मुंगसे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना अनिकेत आरोळे म्हणाली की, जर जीवनामध्ये ध्येय असेल तर नक्कीच यशाचे शिखर गाठता येते. परिस्थिती कशी असली तरी त्यावर मात करून फक्त शिकण्याची मनात जिद्द पाहिजे सर्व संकटावर मात करून मार्ग काढता येतो हे मी अनुभवलेला आहे असा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

        यावेळी देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला तर विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने येथोचीत सन्मान करण्यात आला.

            दिव्यांग भूषण पुरस्कर्ते भाऊसाहेब सावंत सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार पत्रकार युनूस पठाण यांनी मा

नले.