अहमदनगर दक्षीण लोकसभा निवडणुकीचे उमेदवार लोकनेते निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा डिग्रस येथे भेट.
पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लोकनेते निलेश लंके यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुक रिंगणात उतरले असुन जनसंवाद यात्रा सुरू केली आहे या निमित्त निलेशजी लंके राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त दादा तनपुरे जिल्हा परिषदेचे मा सदस्य धनराज शिवाजीराजे गाडे डिग्रस येथे आले असता डिग्रस ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागात केले या वेळी श्री लंके म्हणाले की हि लढाई धनदांडग्या घराणेशाही विरुद्ध सामान्य सर्वसामान्यांचे असुन आपण सर्वांनी मिळून हा लढा पार पाडून विजय मिळवण्याची वेळ आली आहे मतदार संघातील
सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन या वेळी लंके यांनी दिले या प्रसंगी राहुरीचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी डिग्रस जनतेशी संवाद साधत निलेश लंके यांच्या पाठीशी राहुन विजयी करण्याचे आवाहन केले डिग्रस गाव च्या महीला भगीनिंनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवुन लंके यांना शुभेक्षा दिल्या या वेळी बापूसाहेब बेल्हेकर , उपसरपंच रावसाहेब पवार, सचिन भिगारदे, ग ग्रामपंचायत सदस्य अमोल बेल्हेकर, गोरख देशमुख , अनिल शिंदे , तान्हाजी पवार , सनि पवार, मनोज गायकवाड , शरद पवार , जायबा यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष निलेश पवार , पत्रकार राजेंद्र पवार , सह जेष्ठ नागरीकांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते या जन संवाद प्रसंगी निलेश लंके यांनी उपस्थितां सह स्नेह भोजनाचा अस्वाद घेतला.