गुणवत्ता, संस्कार ,संस्कृती जपणारी चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलला प्रवेशासाठी पालकांची पसंती.

गुणवत्ता, संस्कार ,संस्कृती जपणारी चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलला प्रवेशासाठी पालकांची पसंती.

*पालकांची प्रवेशसाठी चाईल्ड करिअर स्कूलला पसंती*

"गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक"

                नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल सलाबतपुर या शाळेस परिसरातील नवोदित पालकांची आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पसंती देत आहेत. गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती, शिक्षा व सुरक्षा या पंचसुत्री नुसार काम करणारी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या चाईल्ड करिअर स्कूल शाळेत पालकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या पाल्याला प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिल्याचे दिसते. उच्चशिक्षित शिक्षक, शिक्षिका, विनम्र सेवा, विद्यार्थी तेथे बस सेवा, शाळा राबवत असलेले विद्यार्थीहिताचे विविध उपक्रम, तसेच म्युझिक, नॉलेज ,कम्प्युटर, स्पोर्टस्, आर्टस या सर्व सेवा -शाळेत मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा ग्रामीण भागात व एकाच छताखाली देणारी ही एकमेव शाळा असल्याने अल्पावधीत पालकांच्या विश्वासात पात्र ठरली आहे. या शाळेत गुणवत्ता बघून प्रवेश न देता , प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्ता निर्माण केली जाते तसेच खेळ घटक व क्रीडा स्पर्धानाही प्राधान्य दिले जाते, आतापर्यंत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शाळेने अनेक बक्षिसे पटकावली आहेत.राज्यस्तरीय गणित, विज्ञान ,कला ,क्रीडा स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची लयलुट करणारी तालुक्यातील एकमेव शाळा आहे.

स्कॉलरशिप ,मंथन ,नवोदय, ओल्म्पियाड , प्रज्ञाशोध या परीक्षाची जोरदार तयारी करून घेतली जाते. अभ्यासासोबतच चित्र ,शिल्प, नृत्य ,नाट्य ,गायन, वादन ,अभिनय या सप्त ललित कलांवर दीर्घकाळ काम केले जाते. शाळेचे संस्थापक सागर बनसोडे सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्टाफ निष्ठापूर्वक, काळजीपूर्वक व तळमळीने अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांचे हृदय ,मन ,बुद्धी आणि आत्मभान जपत असतो. आणि म्हणूनच परिसरातील उच्चशिक्षित हुशार व आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याचा विचार करणाऱ्या सुज्ञ पालक पाल्याचा प्रवेश घेताना सलाबतपुर च्या चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ची पसंती देत असल्याचे चित्र आ

हे.