पेट्रोल पंपाची बँकेत भरण्यासाठी दिलेली रक्कम घेऊन मॅनेजर पसार, स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख रुपयांसह केले जेरबंद .

पेट्रोल पंपाची बँकेत भरण्यासाठी दिलेली रक्कम घेऊन मॅनेजर पसार, स्थानिक गुन्हे शाखेने दोन लाख रुपयांसह केले जेरबंद .

       अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन सावेडी येथे अनिल जोशी यांचा दिपक पेट्रोल पंप नगर मनमाड रोडलगत चालू आहे. या पंपावर ख्रिश्चन कॉलनी तारकपूर येथिल ऑगस्टीन गोन्सालवीस हा व्यक्ती पंप मॅनेजर म्हणून कामास ठेवला होता . पंप मालकाने मॅनेजरकडे पंपावरील जमा रक्कम व कामगारांच्या पगाराची रक्कम रुपये १०,३७, ३८४ इतकी बँकेत भरणा करण्यासाठी दिली होती परंतू ...लबोंपे हसी और दिले में दगा असणारा ... मॅनेजर हि रक्कम घेऊन पसार झाला .

 

     या घटनेविषयी पंप मालकाने तोफखाना पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असता जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्हा उघडकिस आणण्याचे आदेश दिले . आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्‍यांनी आरोपिचा शोध घेण्यास सुरुवात केली . आरोपी हा अंबरनाथ तालुका कल्याण येथे नातवाईकांकडे असल्याचे समजताच सर्व टिम वेशांतर करून अंबरनाथ येथे पोहचली . सापळा रचून आरोपीस दोन लाख रुपये रक्कमेसह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे . आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर संपर्क साधावा असे आव्हान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

           या कारवाईमध्ये नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सायकल राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोलीस नाईक भिमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे व चालक हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे असे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नियुक्ती केली होती .

 

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज अप्पर पोलीस अधीक्षक, सौरभ कूमार अग्रवाल , अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.