राहुरी येथे भागिरथीबाई कन्या विद्यालयात बेटी बचाव बेटी पढाव व शिक्षणाचे अधिकार :विषेश मार्गदर्शन ..
बेटी बचाओ बेटी पढाओ,व शिक्षणाचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.सौ.भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी.या विद्यालयात दिनांक 27/7/2022 रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर दिवाणी न्यायाधीश आदरणीय सौ. पुनम बिडकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्या.सौ.शेडगे.यु.बी यांनी केले. शिक्षण व संस्काराचे महत्त्व समजावून दिले.मा.पुनम बिडकर यांनी आपला जीवनप्रवास व करिअर याविषयावर मार्गदर्शन केले.अॅड. नानासाहेब तनपुरे यांनी मार्गदर्शन केले बेटी बचाओ व .बेटी पढाओ यावर माहिती दिली कु.ऋतुजा गायकवाड हिने विद्यार्थिनींना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष राहुलभैय्या शेटे,अॅड देशमुख साहेब, अॅड गोविंद तनपुरे,अॅड मनिषा पंडीत, अॅड बाचकर साहेब ,श्री.विकास जाधव, उपस्थित होते.श्री.सुर्यवंशी सर यांनी सूत्रसंचालन केले , कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या.सौ.शेडगे.यु.बी.पर्यवेक्षक सौ.गावडे मॅडम, श्री.निकम संतोष ,प्रा.निवडुंगे सर,श्री.शिंदे सर ,सुर्यवंशी सर.म्हस्के मॅडम, यांनी केले.इयत्ता 9वी च्या विद्यार्थिनीनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले.समारोप श्री.शिंदे सर यांनी केला.यावेळी आढाव मॅडम ,बंगाळ मॅडम ,बिडगर मॅडम ,सय्यद सर, बनकर सर, कुलकर्णी सर,कोहकडे मॅडम ,मुसमाडे सर,तनपुरे सर,वेताळ सर,आघाव सर ,सर्जेराव तनपुरे,मच्छिंद्र आघाव ,अक्षय तनपुरे ,प्रसाद गायकवाड ,चंद्रकांत आघाव, मोरे मॅडम ,रवींद्र चौधरी ,उपस्थित होते.देवरे सर व तमनर सर, पातोरे सर ,जाधव सर ,शेळके सर,शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.