प्रहार करिअर अकॅडमीचे अग्निवीर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्राऊंडवर प्रात्यक्षिक - प्रहार जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी .
आज म .फु.कृ.विद्यापिठाच्या ग्राऊंडवर प्रहार करिअर अकॅडमीच्या वतिने अग्निवीर भरतीपूर्व प्रात्यक्षिके घेण्यात आले .यामध्ये प्रहार करिअर अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .
अहमदनगर जिल्ह्यातील म.फु.कृ.विद्यापिठामध्ये 08 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अग्निवीर भरतीसाठी तरूणांनी जोरदार तयारी सुरू केली आहे .अग्नीविरची ही पहिलीच भरती असल्याने या संधीचे सोने
करण्यासाठी तरुणांमध्ये जोरदार प्रयत्न चालू आहे .
अहमदनगर जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी प्रहार करिअर अकॅडमीच्या शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्राउंडवर भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून सर्व प्रात्यक्षिक करून घेतले आहे .भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रहार करिअर अकॅडमीचे नाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगलेच गाजलेले आहे .चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात .बरेच कालावधीनंतर होणाऱ्या अग्नीवर भरतीसाठी प्रहार करिअर अकॅडमीची जोरदार तयारी सुरू आहे . या विद्यार्थ्यांना प्रदीप निपुंगे (CEO माजी सैनिक ) , शिंदे मॅडम तसेच संचालक यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे त्यामुळे या अकॅडमीचे सर्वच विद्यार्थी या भरतीमध्ये निश्चित यश प्राप्त करतील असे मत प्रहार चे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी BPS LIVE NEWS शी बोलताना सांगितले आहे .या भरती प्रशिक्षणामुळे इंडियन आर्मी ,इंडियन नेव्ही , एअर फोर्स रेल्वे भरती ,पोलीस भरती यामध्ये जाण्यासाठी शंभर टक्के यशाची खात्री या करिअर अकॅडमी तर्फे दिली जाते असेही विमोदसिंग परदेशी यांनी सांगितले आहे .