शालेय राहुरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय देवळाली प्रवरा मुले व मुलींमध्ये केदारेश्वर विद्यालय म्हैसगाव ने बाजी मारली विजयी झाले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने राहुरी तालुका शालेय शासकीय 14 17 19 वयोगटाच्या मुले व मुली यांच्या स्पर्धेचा अंतिम निकाल. प्रथम. 14 वर्षे मुले कै. मधुराबाई विश्वनाथ धुमाळ माध्यमिक विद्यालय मुसळवाडी द्वितीय. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल टाकळीमिया तृतीय. श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव 14 वर्षे मुली प्रथम. ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुहा द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल देवळाली प्रवरा तृतीय केदारेश्वर माध्यमिक विद्यालय म्हैसगाव. सतरा वर्ष मुले. प्रथम छत्रपती शिवाजी विद्यालय देवळाली प्रवरा द्वितीय डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल राहुरी फॅक्टरी तृतीय गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल टाकळीमिया. 17 वर्ष मुली प्रथम संत महिपती विद्यालय तांबेरे द्वितीय माध्यमिक विद्यालय देसवंडी. तृतीय केदारेश्वर विद्यालय म्हैसगाव 19 वर्षे मुले प्रथम छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज देवळाली प्रवरा द्वितीय जुनिअर कॉलेज कारवाडी मालुंज खुर्द माहेगाव तृतीय कन्या जुनियर कॉलेज वांबोरी 19 वर्षे मुले प्रथम. स्वर्गीय बापूसाहेब धुमाळ जुनिअर कॉलेज राहुरी द्वितीय डॉक्टर सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज म्हैसगाव तृतीय तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज आरडगाव वरील संघाने विजय मिळवला आहे व प्रथम आलेले संघ जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाले आहेत. ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर राहुरी तालुका शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानवर्धनि सेंट्रल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानदेव शेलार व राहुरी क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश मोढे व ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब मिसाळ होते.तर कार्यक्रमाचे आयोजक क्रीडा शिक्षक विनायक गोरे उद्घाटन प्रसंगी ज्ञानगंगाचे विद्यार्थी परेड संचलन केले व सूत्रसंचालन गणित विषयाच्या अपर्णा पवार वाघ मॅडम भारती साळवे या शिक्षिका व नववी व दहावीचे विद्यार्थी होते स्पर्धा पार पाडण्यासाठी कविता जपे रोहिणी राहणे युगंधरा शेटे सुनील पवार चौबारे मॅडम इत्यादी इत्यादींचे सहकार्य लाभले स्पर्धेसाठी पंच म्हणून कुलधरण सर साईनाथ थोरात सर त्रिभुवन सर शिंदे सर बर्डे सर बाबासाहेब जाधव सर घनश्याप सानप सर कोकळे सर चोपडे सर सौरभ वरखेडे सर बोरुडे सर होले सर कानडे सर उदयसिंग पाटील तसलीम सर पंकज जगताप सुपेकर सर लांडगे सर सर्व क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम केले असे आयोजक क्रीडा शिक्षक विनायक गोरे यांनी सांगितले.