संत शिरोमणी सावता महाराज यांच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
*संत सावता महाराज यांच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तांबे वस्ती वरील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून ४० लक्ष रुपयाचा सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची विधिवत पूजा करून द्वीप प्रज्वलन करत श्रीफळ वाढवून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला .हा लोकार्पण सोहळा माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून गुरुवर्य ह भ प मीराबाई महाराज ,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, महंत सुनील गिरी हे प्रमुख मान्यवर म्हणून लाभले.
यावेळी गुरुवर्य ह भ प मीराबाई महाराज, महंत सुनील गिरी महाराज ,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख ,माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आपले मनोगत व्यक्त करत या लोकार्पण सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
या लोकार्पण सोहळ्याला ह भ प गणेश महाराज चौधरी, ह भ प अंकुश महाराज कादे, ह भ प सुखदेव महाराज मुंगसे,मा.सभापती कारभारी जावळे, कॉन्ट्रॅक्टर रेपाळे साहेब, भैय्यासाहेब देशमुख, एकनाथराव कावरे, एकता परिषदेचे पप्पू जावळे,मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, मा. चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, मा.उपसभापती कारभारी चेडे , चेअरमन बाबासाहेब मुंगसे, एकनाथ भुजबळ , ह भ प पांडुरंग रक्ताटे, दत्ता पाटील मुंगसे , मा. चेअरमन कडूभाऊ तांबे, जनार्धन तांबे बंडू तांबे ,तुळशीराम तांबे, देवस्थानचे अध्यक्ष अशोक तांबे, शरद तांबे निवृत्ती तांबे ,बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, राजू तांबे ,नवनाथ महाराज तांबे ,बाबासाहेब तांबे ,ओंकार तांबे अमोल तांबे ,रामकिसन तांबे ,राजू तांबे ,अंबादास तांबे, पप्पू तांबे ,चांगदेव महाराज तांबे, सोपान तांबे व देवस्थानचे सर्व विश्वस्त व सर्व तांबे परिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संदीप तांबे सर यांनी केले तर आभार सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी मानले.