राहुरी प्रकरणात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लक्ष घालणार

राहुरी प्रकरणात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लक्ष घालणार

*राहुरी प्रकरणात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लक्ष घालणार*

 

 

            राहुरी येथे बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली होती.अशा परिस्थिती राहुरी शहरासह तालुका बंद पुकारण्यात आला होता.सदरील घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.पोलिस प्रशासनाने आरोपींना अटक करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देवून शांतता राखण्याचे अवाहन करण्यात आले होते.सर्व सामाजिक व राजकीय संघटनांनी देखील आरोपीला पकडून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यातच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी देवेंद्र लांबे पा.,नितीन पटारे पा. यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली आहे.

 

             यावेळ जरांगे पाटील म्हणाले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला काळे लावून विटंबना करण्यात आली हि बातमी समजल्यानंतर संताप होवून मनाला खूप वेदना झाल्या आहेत.ज्या प्रवृत्तीने हे कृत्य केले यांना समाजात अशांतता पसरवायची आहे हे स्पष्ट दिसत आहे.परंतु मराठा समाजातील युवक सुज्ञ झाल्यामुळे एवढी मोठी घटना घडून देखील कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.मराठा समाजातील युवक कुणाच्याही भडकाऊ वक्तव्यामुळे उद्रेकाची भूमिका घेवून दंगली मध्ये सहभागी होत नाहीत,आणि जे दंगलखोर असतात ते मराठे नसतात हे निश्चित आहे.सबंधित प्रकरणाविषयी सखोल माहिती जाणून घेवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना प्रकरणाचा तपासाबाबत माहिती घेवून लवकरच पुढील भूमिका जाहीर करण्याचे संकेत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे .

           मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यामुळे महाराष्ट्रातील अखंड मराठा सामाजाचे जरांगे पाटील यांच्या निर्णायक भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.*