मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञा ठाकूर व सहा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निर्दोष मुक्त.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञा ठाकूर व सहा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निर्दोष मुक्त.
मुंबई | विशेष प्रतिनिधी // प्रसाद घोगरे.
हिंदुत्ववादी विचारसरणीला लक्ष्य करत १७ वर्षांपूर्वी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात फसवून फसवले गेलेले प्रज्ञा ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सातही आरोपी अखेर निर्दोष ठरले आहेत. एनआयए न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे हिंदुत्वाच्या विरोधात रचलेला खोटा कट उघड झाला आहे.
हिंदुत्ववादी असल्यामुळे फसवले :
साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासारख्या राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांना केवळ ते हिंदुत्ववादी असल्यामुळे या प्रकरणात जबरदस्तीने गुंतवण्यात आले. कोणताही ठोस पुरावा नसताना, धर्माच्या नावाने बदनामी करण्यात आली. "हिंदू दहशतवाद" हा शब्द पसरवून एक विचारसरणीच कलंकित करण्याचा प्रयत्न झाल्याची खंत हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली.
न्यायालयाचे कठोर निरीक्षण :
एनआयए न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, आरोपींविरुद्ध ना आरडीएक्सचा वापर सिद्ध झाला, ना बॉम्ब ठेवण्यामागचा कट, ना कोणतीही संघटित बैठक. आरोपींच्या विरोधात दाखल झालेले बहुतेक पुरावे अपूर्ण, संशयास्पद आणि न्यायालयीन मान्यतेस अपात्र होते.
काँग्रेस सरकारचा खोटा कट उघड..?
सदर प्रकरणात तत्कालीन काँग्रेस सरकारने हिंदुत्वविरोधी अजेंडा राबवत निर्दोष लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले. "भगवा दहशतवाद" हा बनाव निर्माण करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुत्वाशी संबंधित कार्यकर्त्यांची छवि मलीन करण्याचा कट स्पष्ट झाला असल्याचं मत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले..
तसेच काँग्रेसच्या राजवटीत, तपास संस्थांवर दबाव टाकून सामान्य हिंदूंचा, विशेषतः हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या लोकांचा छळ करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
न्यायालयाचा स्पष्ट संदेश : दहशतवादाला धर्म नसतो
न्यायालयाने निकालात म्हटले की, कोणताही धर्म हिंसाचाराचे समर्थन करत नाही. फक्त वैचारिक भूमिकेवरून किंवा नैतिक शंकांच्या आधारावर एखाद्याला दोषी ठरवणे हे न्यायाच्या तत्त्वांना धरून नाही. संशयाचा फायदा आरोपींना मिळायलाच हवा.
हिंदुत्वाचा विजय, खोट्यांचा पराभव
हा निर्णय म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विजयाचा दिवस आहे. अनेक वर्षं अन्याय सहन केलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर व कर्नल पुरोहित यांना न्याय मिळाला. हा फक्त न्यायालयीन निर्णय नाही, तर देशात हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्यांच्या अजेंड्याला मिळालेला जबरदस्त झटका आहे.
नेमके काय म्हंटले विखे पाटील :
मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरणात हिंदूत्वाला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कोट्यवधी जनतेच्या भावना त्या निमित्ताने दुखावल्या गेल्या. भगवा रंग आणि हिंदू संस्कृती हे आपल्या आध्यात्मत्माच प्रतीक आहे आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असल्याचं मत प्रसार माध्यमांसमोर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
सूचना / डिस्क्लेमर:
वरील बातमी विविध माध्यमांमधून प्राप्त माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. या बातमीतील मते, दावे किंवा निष्कर्ष हे संबंधित व्यक्ती, संघटना किंवा माध्यमांच्या विधानांवर आधारित आहेत. यामध्ये कोणत्याही जाती, धर्म, राजकीय पक्ष अथवा विचारधारेचा पुरस्कार अथवा अवमान करण्याचा उद्देश नाही. बातमीचा हेतू केवळ माहिती देणे हा असून, ती वाचकांनी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार ग्रहण करावी. न्यायालयीन निर्णय अंतिम असून त्याविषयी अधिकृत दस्तऐवज आणि आदेशांचा आधार घ्यावा.








