नेवासा तालुक्यातील बाभूळखेड्यात कृषी महाविद्यालय सोनई च्या कृषिकन्यांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत.
प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद
बाभूळखेड्यात सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे स्वागत....
बाभुळखेडा ता नेवासा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मुळा एज्यूकेशन सोसायटी चे कृषी महाविद्यालय सोनई येथील ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम आतंर्गत कृषी कन्यांचे आगमन झाले या निमित्ताने बाबुळखेडा गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.या कृषिकन्या पुढील दहा आठवडे गावमध्ये राहून विविध कार्यक्रम राबवणार आहेत. कोळसे साक्षी दत्तात्रय, आंधळे ऋतुजा बाळासाहेब, आव्हाड दिपाली महादेव, धांडे प्रतिक्षा चंद्रकांत , गायकवाड ऋतुजा लक्ष्मण, चिने रसिका अशोक अशी या कन्यांची नावे आहेत.यावेळी सरपंच श्री ज्ञानेश्वर साहेबराव औताडे,उपसरपंच श्री नारायण राधाकिसन विधाटे सोसायटी चेअरमन श्री नारायण अण्णासाहेब कडू, पत्रकार महेश औताडे, ग्रामसेवक इंगळे के.बी,आदी उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ हरि मोरे तसेच कर्यक्रम अधिकारी प्रा.पडघलमल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोओळी...
बाभुळखेडा ता नेवासा येथे ग्रामस्थांच्या वतीने कृषी कन्यांचे स्वागत करण्यात आले.