राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ राहुरी शहरात कडकडीत बंद..

राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ राहुरी शहरात कडकडीत बंद..

राहुरीत कडकडीत बंद

शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडक बंदोबस्त

राज्यपाल कोशारी व चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमांना मारले जोडे

राहुरी प्रतिनिधी :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ व भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील शिवराय फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला राहुरी शहरातील सर्व छोटे व्यापारी मोठे व्यापार्यांसह सर्व नागरिकांनी सहभागी होत बंद पाळला.

महाराष्ट्र सरकार मधील शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपिता जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अवमानकारक वक्त्यव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखवल्या आहे याच्या निषेधार्थ व चंद्रकांत पाटील यांच्या वर शाई फेक करणारे भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर कारवाई व्हावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बंदप्रसंगी राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल,वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे भीम आर्मी महिला आघाडीच्या मुन्नाताई चावरे, अनिताताई म्हस्के, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जालिंदर घिगे, समता परिषदेचे प्रशांत शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधने, रिपब्लिकन युवा सेनेचे चंद्रकांत जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, यशवंत सेनेचे विजय तमनर,रिपाई आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यानंतर राज्यपाल कोशारी व चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

राहुरी शहरात सकाळपासून शुकशुकाट होता,शहरातील बहुतांश दुकाने, हाॅटेल सकाळपासून बंद होती. बंदमुळे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बंदमुळे शहरातील व्यवहारावर परिणाम झाला. नवी पेठ जुनी पेठ ,मेन रोड, आडवी पेठ ,कॉलेज रोड, मल्हारवाडी रोड, स्टेशन रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, श्याम जाधव,साहिल जाधव, अक्षय भालेराव ,अमोल भालेराव, युवराज पारडे, जगदीश भालेराव, दत्ता जोगदंड, महेश साळवे, अशोक तुपे, हरिदास जाधव, विजय पवार, प्रशांत लहारे यांसह अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बंद यशस्वी करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व शहर कडकडीत बंद ठेवण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समितीचे कांतीलाल जगधने भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन भाई बिवाल वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख पिंटू नाना साळवे व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे या सर्वांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन आंदोलन यशस्वी केले.