महंत भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलश रोहन सोहळा उत्साहात संपन्न .

महंत भास्करगिरीजी महाराजांच्या हस्ते मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलश रोहन सोहळा उत्साहात संपन्न .

प्रतिनिधी  खेडले परमानंद नेवासा

राजेगाव रस्त्या सद्गुरु पंढरीनाथ महाराजांच्या आश्रमात नव्याने बांधण्यात आलेल्या मंदीरात देवगड संस्थानचे प्रमुख महंत  गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने पाच दिवसीय सोहळ्याची सांगता झाली.

 

येथील मंदीरात विठ्ठल-रुक्मिणी, बालब्रम्हचारी माधवबाबा लांडेवाडीकर,संत वामनभाऊ, संत भगवान बाबा व इतर देवतांच्या मुर्ती विराजमान आहेत.

पाच दिवस किर्तन महोत्सव, यज्ञ सोहळा संपन्न झाला.

महंत भास्करगिरी जी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सोहळ्यास देणगी दिलेल्या दानशुर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या आध्यात्मिक कार्याचे सर्वांनी कौतुक केले.

 

कार्यक्रमात रामेश्वर राऊत शास्री महाराज यांनी आश्रम व वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याची माहिती दिली.गुरुवर्य भास्करगिरी बाबांजीच्या शुभ आगमनाने आश्रमात प्रत्यक्ष श्री संत एकनाथ महाराजांचेच पाऊल लागल्याची अनुभूती आली असे ह भ प राऊत महाराज यांनी भावना व्यक्त केली . यावेळी  संत देवीदास महाराज आडभाई, शरद शास्री महाराज,अशोक महाराज गाडेकर मच्छिंद्र महाराज उंबरेकर, बाळकृष्ण महाराज कानडे तसेच पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

 

माधवबाबांच्या आशिर्वादाने हाती घेतलेले कार्य पंढरीनाथ महाराज यांनी अतिशय कष्टातून उभे केले. त्यांचे आध्यात्मिक कार्य रामेश्वर शास्री अतिशय चांगल्या पध्दतीने पुढे नेत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे भास्करगिरी महाराज यांनी सांगितले.लक्ष्मण तांदळे यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.कुत्तरवाडे वस्तीवरील सर्व भक्त परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.

     नेवासा तालुक्या सह नगर जिल्हा व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवर्य बाबाजींनी त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे.

       गुरुवर्य बाबाजींची दिव्यदृष्टी त्यांनी एखाद्या कामात दिलेला आशीर्वाद हा नक्कीच त्या कार्याचे पूर्णत्वाला जाण्याचे संकेत असतात.

 

  ------------------------------