मुळा धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू, अथक परिश्रमानंतर सलीम भाई शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना मृतदेह बाहेर काढण्यात आले यश .

मुळा धरणामध्ये बुडून एकाचा मृत्यू, अथक परिश्रमानंतर सलीम भाई शेख व त्यांच्या सहकाऱ्यांना मृतदेह बाहेर काढण्यात आले यश .

राहुरी तालुक्यातील मुळा धरणामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे .या घटनेमुळे मुळा धरण परिसरात व पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे .सध्या मुळा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे .सुट्टीचा दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात .आज नगर मधील सात ते आठ व्यक्ती धरण पाहण्यासाठी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास मुळाडॅम येथे आले होते .यापैकी चेतन कैलास शिरसाट वय 36 राहणार भिस्तबाग चौक अहमदनगर यांनी पोहण्यासाठी धरणात उडी घेतली परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला .त्यांच्या साथीदारापैकी कुणालाही पोहता येत नव्हते असे समजले आहे .चेतन शिरसाट बुडाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडा ओरडा केल्याने अनेकांनी तेथे गर्दी केली होती .

              घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तसेच वरवंडी ग्रामपंचायत सदस्य श्री .सलीम शेख यांना समजताच त्यांनी तात्काळ आपल्या सहकारी मित्रांसमवेत घटनास्थळी धाव घेतली .अथक परिश्रम करून चेतन शिरसाठ याचा मृतदेह बाहेर काढण्यास सलीम शेख व त्याचे सहकारी मित्रांना यश आले .सलीम शेख यांनी तात्काळ या घटनेची माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री . नीरज बोकील यांना कळविले आहे .त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे .

         दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने मुळा धरणांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे .धरणाची माहिती पूर्ण नसल्याने पर्यटकांनी पाण्यामध्ये उतरून जीव धोक्यात घालू नये असा सल्ला सलीम शेख यांनी दिला आहे .धरणामध्ये बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी किंवा मृत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी सुविधा मिळत नसल्याची खंतही सलीम शेख यांनी व्यक्त केली आहे .आज घडलेल्या घटनेमध्ये मृतदेह बाहेर काढण्यासाठी श्री . सलीम शेख यांच्याबरोबर विजय माळी,इंद्रजीत गणगे,छबु पवार, दिलीप बर्डे, सुनील माळी त्याचबरोबरच गावातील अनेक तरुणांनी सहकार्य केले आहे .