मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलिसांचा सन्मान,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक.
*मराठा एकीकरण समितीच्या वतीने राहुरी पोलिसांचा सन्मान*
*पो. नि.संजय ठेंगे यांचे कार्याचे सर्वत्र कौतुक*
राहुरी पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शना खाली API गणेश चव्हाण, API शिंदे,पो.उप निरीक्षक पोपट कटारे,पो.उप निरीक्षक चारुदत्त खोंडे यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार मराठा एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पोलिस कर्मचारी अशोक शिंदे,सूरज गायकवाड,विकास साळवे,सचिन ताजने,नदीम शेख,प्रमोद ढाकणे,आदिनाथ पाखरे,गणेश निपणे,रवींद्र कांबळे,दादासाहेब रोखले यांचा सन्मान करण्यात आला.
राहुरी पोलिस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून सोळा मुली बेपत्ता असल्याची नोंद दाखल झालेली होती त्यापैकी तेरा मुलींचा शोध पो. नि.संजय ठेंगे यांनी लावला.तसेच शेतकऱ्यांच्या विरीहितील मोटारी चोरी जाण्याचे सत्र मागील काही वर्षात चालू होते परंतु राहुरी पोलिस ठाण्यातील नव्याने दाखल झालेल्या सर्व पोलिस बांधवांनी पाण्याच्या मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा व दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त केला.पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी राहुरी पोलिस ठाण्याचा पदभार घेवून अवघा दिड महिना झालेला आहे.कमी कालावधीत मागील २२ गुन्ह्यांचा तपास लावत गुन्हेगारांना अटक केली आहे.
राहुरी तालुक्याील अनेक महाविद्यालये,शाळा येथे पो. नि. ठेंगे यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत मला मुलींना प्रबोधन करत शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या रोडरोमिवोंचा बंदोबस्त केला आहे. राहुरी शहरात पेठे मध्ये कायम वाहतुकीस अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत असे,या होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आलेली आहे.
यावेळी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की मराठा एकीकरण समितीच्यावतीने राहुरी पोलिस ठाण्यावर अनेक वेळा आंदोलने केलेली आहेत.ज्यावेळी राहुरी तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मराठा एकीकरण समितीचे सदस्य पोलिसांच्या विरोधात आंदोलने देखील करतात.ज्यावेळी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून राहुरीकरांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यावेळी सर्व सदस्य सामाजिक जबाबदारी समजून पोलिस बांधवांच्या सन्मानासाठी सदैव तत्पर असतात,राहुरी तालुक्याला आम्ही आमचे कुटुंब समजतो असे लांबे पा.म्हणाले.
या प्रसंगी सुरेश बानकर, सतीश घुले,राजेंद्र लबडे,संदीप गाडे,अशोक तनपुरे,कैलास तनपुरे,मेजर नामदेव वांडेकर,सुनील निमसे,धनंजय देशमुख,सतीश चोथे,विलास तनपुरे,वैभव तनपुरे,रवींद्र कदम,सागर ताकटे ,रोहित नालकर ,देवेंद्र जाधव ,अविनाश शिरसागर,मच्छिंद्र गावडे, सुभाष जुंदरे ,प्रताप जाधव,मुकुंद निमसे,मुन्ना शेठ तनपुरे,अशोक कदम,भास्कर सांगळे,दिनेश झावरे,विनायक बाठे,रवींद्र तनपुरे शेखर सुडके, मंगेश येवले,रंगनाथ येवले,विकास लांबे,मच्छिंद्र लांबे,अनिल पेरणे आदी उपस्थित होते.