महावितरणाच्या कृषी पंपाच्या वीज तोडणी विरोधात, शेतकर्यांचे रास्ता रोको आंदोलन..
प्रतिनिधी: -नगर
माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या विरुद्ध पुकारला बंड.
कुठलीही पूर्वसूचना न देता वीज तोडणी सुरू केलेली आहे.
तोंडी आलेला घास हिसकण्याचे काम महावितरण करीत आहे.गव्हाचे, कांद्याचे पिके शेवटच्या टप्प्यात आहे. तरी शासनाने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम चालू केले आहे.
महाराष्ट्रात पंढरपूर नंतर नगर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी महावितरणा विरुद्ध वाचा फोडली आहे.
आंदोलन करत या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आव्हान केले आहे, की संपूर्ण महाराष्ट्रभर महावितरणाच्या कुटिल कारस्थाना विरुद्ध सुरू केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यात याव.
माका तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या शेतकऱ्यांनी याअगोदर विजबिल भरूनही कुठलीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी चालू केली आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड असंतोष निर्माण झाला व याचेच रूपांतर रास्तारोको मध्ये झाले आहे परिसरातील पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी मिळून शेवगाव- पांढरीपुल या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला शेतकऱ्यांनी प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद दिला व यासंदर्भात कुठलीही कारवाई न झाल्यास हे आंदोलन आणखी व्यापक स्वरूपाचे करण्यात येईल अशी शेतकऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला आव्हान केले आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलनाचे रुद्र रूप पाहून महावितरणने नरमाईची भूमिका घेत वीज जोडणी हाती घेतली आहे.
या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी गावचे सरपंच नाथा घुले,माजी सरपंच यादव शिंदे,गंगाधर भुजबळ, भगवान गंगावणे,शेतकरी जबाजी पांढरे,पांडुरंग घुले, रामभाऊ तवार,कडू चंद कोटके ,अनिल घुले,ज्ञानेश्वर सानप, बाबा लोंढे,ज्ञानेश्वर पागिरे ,अंबादास गायकवाड,मोहन पागिरे ,बारकू खेमनर,बळी काळे,मल्हारी आखाडे,आबा पालवे,अनिल घुले,ज्ञानेश्वर सानप,बाबा लोंढे,ज्ञानेश्वर पगारे, अंबादास गायकवाड,मोहन पागिरे, बारकू खेमनर,असा मोठ्या प्रमाणात शेतकरी या आंदोलनाला उपस्थित होते.