वरवंडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षकांचा केला सन्मान .

वरवंडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षकांचा केला सन्मान .

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वरवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय जालिंदर आडसुरे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सौ जाधव मॅडम व सौ खोसे मॅडम यांचा सत्कार  करण्यात आला .या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख श्री थोरात साहेबही उपस्थित होते.

याप्रसंगी थोरात साहेब यांनी शाळेच्या विकासाविषयी समाधान व्यक्त करून मार्गदर्शन केले .नवीन सुरू असलेल्या शाळा खोल्यांचे बांधकाम पाहून समाधानही व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच ,उपसरपंच तसेच शाळेतील मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक उपस्थित होते . सौ खोसे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .

.