जागतिक महिला दिनानिमित्त देवळाली प्रवरातील महिलांना प्रहारने दिली अनोखी भेटदेवळाली प्रवरा नगर पालिकेवर प्रहार चा धडक मोर्चा.प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे.
प्रेस नोट
जागतिक महिला दिनानिमित्त देवळाली प्रवरातील महिलांना प्रहारने दिली अनोखी भेट : प्रहार चा दणका
देवळाली प्रवरा नगर पालिकेवर प्रहार चा धडक मोर्चा
देवळालीत प्रहार महिला कार्यकरणी ची निवड
देवळाली प्रवरा - दि. ८ मार्च
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित दादा पोटे यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा शहरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर सभामंडपामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार महिला आघाडीच्या देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी सौ भाग्यश्री कदम व राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्षपदी सौ रजनी कांबळे यांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करून नियुक्ती पत्र देण्यात आले. उपस्थित महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून प्रहार श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांच्या नेतृत्वात महिलांसह पाण्याचे हंडे घेऊन गावामधून फेरी काढत देवळाली प्रवरा नगरपालिकेवर मुख्याधिकारी यांच्या दालनावर धडक देत सर्व महिलांसाठी ठिय्या आंदोलन केले.
याप्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी स्वतंत्र भारतामध्ये पाणी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत हक्कापासून कोणीही वंचित राहू शकत नाही आणि कोणी धनदांडगे पुढारी जर जाणीवपूर्वक या महिलांना पाण्यापासून वंचित ठेवू पाहत असतील तर त्यांनी वेळीच ठिकाण्यावर यावे असे सांगून नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांनी स्थानिक राजकारण मध्ये न येऊ देता या महिलांना हक्काचे पाणी द्यावे अशी मागणी करून पाणी मिळाल्याशिवाय आम्ही ठिय्या आंदोलन सोडणार नाही या भूमिकेवर ठाम राहिले. यानंतर आप्पासाहेब ढुस यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्या जागेसाठी नगरपालिका नळकनेक्शन देत नाही त्या जागेत यापूर्वी नगरपालिकेने काही नागरिकांना नळ कनेक्शन दिले आहेत, त्यामुळे या महिलांबरोबर होणारा भेदभाव नगरपालिकेने थांबवला पाहिजे. जी जागा खासगी आहे त्या जागेची कारणे नगरपालिका देत असताना त्या जागेत बांधलेल्या घरांची घरपट्टी नगरपालिका सक्तीने वसूल करत आहे मग त्यांना पाणी का नको, जर त्या जागेची घरपट्टी नगरपालिकेला चालते तर पाणी का नको? असा सवाल जनता विचारत आहे. पाणी न मिळाल्यास आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे जाहीर ढुस यांनी यावेळी जाहीर केले. नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर अरगडे यांनी आंदोलनावर ठाम राहात आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला होता. मुख्याधिकारी अजित निकत यांनी आठ दिवसात या नागरिकांना पाणी देणार असल्याचे लेखी स्वरूपात आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले. त्यामुळे आप्पासाहेब ढुस यांनी आंदोलनाला पूर्ण यश मिळाले असले तरी पाणी मिळेपर्यंत आंदोलन स्थगित करत असल्याचे मुख्याधिकाऱ्यांना जाहीरपणे सांगितले. अजित निकत देवळाली नगरपालिका मुख्याधिकारी यांनी समोर येऊन प्रांताधिकारी आणि प्रशासक यांच्याशी चर्चा करून आठ दिवसात प्रत्यक्षात नळजोड योजना राबवणार असल्याचे जाहीर केले व एका सात वर्षाच्या पाण्याचा हंडा घेऊन येणाऱ्या छोट्या मुलींच्या हस्ते नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यां कडून लेखी आश्वासन पत्र स्वीकारून पाणी मिळेपर्यंत आंदोलन स्थगित केले. याप्रसंगी जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, जिल्हा संघटक सरपंच बाळासाहेब खर्जुले, प्रहार सोशल मीडिया जिल्हा प्रमुख संजय वाघ, प्रहार नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, प्रहार दिव्यांग क्रांती राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रहार दिव्यांग क्रांती देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख,विजय कुमावत, आशा माळी, सुरेखा पंडित, वंदना कांबळे, लैला शेख, अफसाना सय्यद व शेकडो ग्रामस्थ या आंदोलनाला उपस्थित होते आश्वासन पूर्ती झाल्यानंतर देवळातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले.