वडिलांची आठवण राहावी म्हणून मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते वडिलांच्या कबरीवर फळांचे झाड लावून हिवाळे कुटुंबांनी समाजापुढे ठेवला .
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील नुकतेच हिवाळे कुटुंबियातील डॅनियल हिवाळे यांचे निधन झाले . त्या ठिकाणी कुटुंबीयांना भेट देण्यासाठी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मा.नामदार शंकरराव गडाख साहेब आले होते.
संपूर्ण तालुक्याला माहित आहे की, गडाख कुटुंबीयांनी मोरेचिंचोरा आहे गाव दत्तक घेऊन, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त, काही कार्यक्रम निमित्त एक तरी झाड लावा हा उपक्रम राबवला .व ती माळरान जमीन आज एक निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळत आहे. हा आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्रभर गाजत आहे. हा निर्णय पुढील युवा पिढीसाठी घेऊन एक महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून दिला .म्हणून गडाख कुटुंबियाचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.
हाच स्तुत्य उपक्रम आता सर्वत्र नेवासा तालुका भर राबवत आहे. म्हणूनच देडगाव येथे हिवाळे कुटुंबीयांतील सोसायटीचे नूतन संचालक योसेफ हिवाळे व जिल्हा परिषद शिक्षक बुथवेल हिवाळे यांनी वेगळा पायंडा पाडत आपल्या वडिलांच्या कबरीवर फळांचे झाड लावून समाज्याला आदर्श घालुन दिला.
यावेळी मा.नामदार शंकरराव गडाख म्हणाले की, हा देश ऋषी व कृषी यांचा कृषी प्रधान
देश आहे. या कुटुंबाचं कौतुक केलं पाहिजे. कारण की हे फळाचे झाड लावून यांनी वडिलां च्या आठवणीला आयुष्यभर जतन करून ठेवण्याचा निर्णय घेतला. व झाडाच्या रूपाने हे कुटुंब वडिलांना कायम पाहील व त्यांच्या आठवणी ला उजाळा मिळेल.प्रत्येकाने एक तरी झाड लावावं हीच अपेक्षा ग्रामस्थांकडून करतो. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सांत्वन भेटीदरम्यान वांढेकर कुटुंबियातील गंगुबाई यांच्याही कुटुंबाला भेट दिली. व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक पाटील मुंगसे हे आजारी असल्याकारणाने त्यांनाही आरोग्याची काळजी घेण्यास सल्ला देत मुंगसे परिवाराला ही भेट दिली. या कार्यातून असे दिसते की, सर्व सामन्याचा नेता शंकरराव गडाख सर्व घटकात सारखी काम करतात. म्हणुनच या कार्याचे तालुका भर कौतुक होत आहे.
यावेळी देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, माजी चेअरमन निवृत्ती मुंगसे, बालाजी देवस्थान चे विश्वस्त सुभाष मुंगसे, मा. दत्ता पाटील मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे ,विश्वास हिवाळे टेलर, सचिन हिवाळे, संजय हिवाळे, अरुण हिवाळे, बापु हिवाळे व आदी ग्रामस्थ या भेटदरम्यान उपस्थित होते.