जयहिंद लोकचळवळ आयोजित "युवा प्रशिक्षण शिबीर 2025" यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे पार पडले.

नाशिक ( प्रतिनिधी )  :- महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून आलेल्या निवडक युवकांनी या चार दिवसीय निवासी शिबरात सहभाग नोंदवला.

शिबिराच्या समारोपप्रसंगी जयहिंद लोकचळवळचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. सुधीरजी तांबे यांनी सहभागी युवकांशी संवाद साधून त्यांना जयहिंद च्या ध्येय धोरणांविषयी माहिती दिली. त्यांनी युवकांच्या ऊर्जा, उमेद व जिद्दीचे कौतुक करत त्यांच्या कडून भविष्यात सुदृढ समाजनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली.

प्रशिक्षक मा.श्रीकांत लक्ष्मीशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात युवकांना नेतृत्व विकास, व्यक्तिमत्त्व विकास, संघटन कौशल्य, सामाजिक भान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समाजप्रेम या संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत करणारे विचारमंथन सत्र आयोजित करून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्यात आली.

डॉ. सुधीरजी तांबे यांनी या शिबिरातून घडलेले युवक उद्या समाज परिवर्तनाचे शिल्पकार ठरतील आणि समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्व म्हणून पुढे येतील असा विश्वास व्यक्त केला.