सोनई - खेडले परमानंद रस्त्याची दुरुस्ती धातूर- मातूर स्वरूपाची ,प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

सोनई - खेडले परमानंद रस्त्याची दुरुस्ती धातूर- मातूर स्वरूपाची ,प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

खेडले परमानंद प्रतिनिधी  //

    सोनई खेडले परमानंद रस्त्याची डाग - डूजी सुरू आहे परंतु ती अतिशय थातूरमातूर स्वरूपाची असल्याकारणाने अवघ्या काही दिवसातच परिस्थिती जशीच तशी होणार आहे .

      गेल्या अनेक वर्षांपासून खेडले परमानंद ते सोनई हा दहा किलोमीटरचा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झालेली असताना नुकतेच या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू आहे ,परंतु सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसून येत आहे.

    कचकडी खड्ड्यात टाकून डांबराचा साधा शिपका दिलेला दिसून येत आहे ,अशी परिस्थिती असताना प्रशासनाचे मात्र सदर गोष्टीकडे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून रस्त्याची योग्य ती दुरुस्ती  करावी अशी नागरिकांची मागणी आहे .

     संबंधित ठेकेदाराला योग्य ती नोटीस बजावून कामाचा दर्जा सुधारावा .

            या खराब रस्त्यामुळे विद्यार्थी ,सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेली आहेत संबंधित बाबीचा गांभीर्याने विचार करून तातडीने सदरचा प्रश्न मार्गी लावावा.