महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्रातर्फे पिंप्री अवघड येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न

महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्रातर्फे पिंप्री अवघड येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न

       

         महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्रातर्फे पिंप्री अवघड येथे जागतिक पर्यावरण दिन दि. 05 /06/2026 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी जिल्हा कार्यालयाचे उपजीविका विकास अधिकारी प्रशांत पाटील ,एम आय एस योगेश कदम,लिपिक मच्छिंद्र कुऱ्हे ,सी एम आर सी चे उपजीविका सल्लागार अक्षय थोरात ,कार्यकारणी मीरा कांबळे ,क्षेत्रीय सहयोगीनी वैशाली ढसाळ , ग्रामसेवक शुभांगी चोखर आणि पुष्पा लांबे उपस्थित होते . विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला होता .

 

        महिला आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगर अंतर्गत प्रतिभा लोकसंचालित साधन केंद्राच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पिंप्री अवघड येथील ज्ञानेश्वरी महिला बचत गटातील फूड प्रोसेसिंग हळद युनिटला भेट दिली .पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आला .जिल्हा कार्यालयाचे उपजीविका विकास अधिकारी प्रशांत पाटील यांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधतांना वृक्षारोपण व संगोपन ही काळाची गरज असल्याचे सांगितले . यावेळी बचत गटातील उपस्थित सर्व महिलांना मोफत बियाणे वाटप करण्यात आले .

       

      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वैशाली धसाळ यांनी मानले . या कार्यक्रमासाठी , सुनिता लांबे, कांचन लांबे , चंद्रकला पवार, सिमा लांबे , स्वाती आव्हाड , संगिता गटकळ , मंगल धसाळ ,कमाबाई चौधरी सह सर्व बचतगट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .