पानेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी घोलप यांची बिनविरोध निवड .

पानेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी घोलप यांची बिनविरोध निवड .

पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध -घोलप

पानेगांव : -

               जिल्ह्यात शिवछत्रपती अश्वारूढ पुतळ्याने तसेच अंतर्गत विकासाने ओळख निर्माण झालेल्या तसेच अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या मुळाथडी परीसरातील माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली यांचा तीन गटात बिनविरोध पार पडली उर्वरीत पानेगांव येथील ग्रामपंचायत निवडणूक दि.५/१०/२३ रोजी मतदान पार पडलं  

             लोकनियुक्त सह सदस्य पदासाठी १०जागा आहे ८जागा बिनविरोध झाल्या. लोकनियुक्त सरपंच सह प्रभाग नं एक मध्ये एका जागेवर सदस्य पदासाठी निवडणूक झाली.पानेगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार निवडणूक निरीक्षक म्हणून नेवासा नायब तहसीलदार किशोर सानप हे होते .नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ. निकीता मच्छिंद्र भोसले पिठासिन अधिकारी यांनी काम पाहिलं.

         ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांनी उपसरपंच निवडणूक बाबत माहिती देवून नवनिर्वाचित सदस्य ओळख करून दिली त्याच बरोबर उपसरपंच पदासाठी सदस्य हनुमंता घोलप यांचा अर्ज आला असल्याचं निवडणूक निरीक्षक नायब सानप तसेच सभेत सांगून उपसरपंच घोलप यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले.

           यावेळी पानेगांव येथील माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी केलेल्या विकासाभिमुख कामाबद्दल नायब तहसीलदार सानप यांनी गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले.माजी लोकनियुक्त माजी सरपंच यांनी आमदार शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांचा मार्गदर्शनाखाली विकास झाला असून असंच पुढचं काम नव्या टीमनं करावं असा शुभेच्छा व्यक्त केल्या.

           यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुरेश जंगले, शांताबाई जंगले,कुसूम शेंडगे, रमेश जंगले, दिपाली जंगले, चंद्रकला गुडधे,मिना जंगले, रंजना जाधव सह माजी लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, माजी उपसरपंच रामराजे जंगले, अनिल जंगले, किशोर जंगले, डॉ काकडे, विठ्ठल आरंगळे, काकासाहेब जंगले, संदिप जंगले, निवृत्ती जंगले,सुभाष गुडधे, रमेश गुडधे, बाळासाहेब जंगले, नानासाहेब जंगले, सतिश जंगले, बद्रिनाथ जंगले, निलेश घोलप, ताराचंद घोलप, प्रविण घोलप,मुकुंद घोलप, मच्छिंद्र घोलप, तानाजी घोलप, नामदेव गुडधे पाराजी गुडधे, भाऊसाहेब काकडे,रघूनाथ जंगले रमेश गुडधे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले,पिंटूभाऊ जंगले, तुकाराम चिंधे,तानाजी गायकवाड, गुलाब गायकवाड,दादासाहेब काकडे,कचरु जंगले, सुरेंद्र जंगले, उद्धव चिंधे,सागर आंबेकर, बाबासाहेब शेंडगे, सुनिल चिंधे,आदींसह मान्यवर उपस्थित होते. सोनई मंडल अधिकारी प्रशांत कांबळे,तलाठी भाऊसाहेब पतंगे ,सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि माणिकराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मृत्यूजंय मोरे,मुळे दादा,ठोंबरे सुत्रसंचालन बाळासाहेब नवगिरे प्रस्तावित सुभाष गुडधे आभार सुरज जंगले यांनी मानले.

             नवनिर्वाचित उपसरपंच हनुमंत उर्फ दत्तात्रय पाटील घोलप यांचे अभिनंदन माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील माजी सभापती सुनिताताई गडाख, मुळाचे संचालक संजय जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, यांनी केले.