रात्रीच्या घोर काळोखात महावितरण कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य.

रात्रीच्या घोर काळोखात महावितरण कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य.

 प्रतिनिधी:- खेडले परमानंद ,नेवासा

करजगाव सब स्टेशनचे कर्तव्यदक्ष महावितरण कर्मचारी.

दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 8वाअचानक लिंबाचे झाड 33kv विद्युत वाहिनी तारेवर कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

       परंतु क्षणाचीही विलंब न करता महावितरण कर्मचारी येळे वायरमन, जाधव वायरमन, कसबे वायरमन यांनी भर अंधारात

 झाड तोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. प्रचंड उष्णतेमुळे जनतेचे सध्या हाल होत आहे . शेतकऱ्यांना पिकाला पाणी भरायचे आहे.

या गोष्टीचा विचार करून जे कर्तव्य निभावले त्याबद्दल त्यांच्या कर्तव्यनिष्ठ तेला सलाम.

        करजगाव सब स्टेशनचे कर्मचारी नियमित आपल्या कार्याशी कर्तव्यनिष्ठ असतात. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

         त्यांच्या कर्तव्यनिष्ठते बद्दल पंचक्रोशीतील सर्व नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.