शेल कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वांबोरी ग्रामस्थांकडून श्री सचिन ठाणगे यांचा गौरव .

शेल कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वांबोरी ग्रामस्थांकडून श्री सचिन ठाणगे यांचा गौरव .

*वांबोरी ग्रामस्थांकडून श्री सचिन ठाणगे यांचा गौरव*

 

             राहुरी : शेल कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वांबोरी येथील सुपुत्र सचिन ठाणगे यांना उत्कृष्ट वितरक (NFR Retailer of the year 2021) म्हणून चार हजार डॉलर व सन्मानचिन्हाचे पारितोषिक त्यांना मिळाले आहे. आता ते दुबई येथे भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ठाणगे यांचे शालेय शिक्षण वांबोरी येथे झाले असून त्यांचे हॉटेल मॅनेजमेंट व एमबीएचे शिक्षण झाले आहे. 

     

         वांबोरी येथील युवकाने घेतलेल्या भरारीचे कौतूक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देतांना ठाणगे म्हणाले, माझ्या यशात पत्नी, आई-वडिलांचा व आपण सर्वांचा मोठा वाटा आहे. पुढील कालावधीतही अधिक उत्तम कामगिरी करून चांगली कामगिरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ.झवर, डॉ.बिहानी, जुगलकिशोर राठी, सारंग पटारे, रावसाहेब गडाख, शेवाळे सर, राहणे सर, गडाख सर, दत्तात्रय ठाणगे, प्रसन्न मुत्था व ठाणगे यांच्या पत्नी अमिता ठाणगे इ.उपस्थित होते.