मृदा व जलसंधारण मंत्री गडाख यांच्या पी ए वर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी ऋषिकेश शेटे यास अटक.
मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचे पी .ए राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींपैकी ऋषिकेश वसंत शेटे यांना आज स्थानिक गुन्हे अंवेशन शाखेच्या पथकाने खरवंडी तालुका नेवासा येथील हनुमान नगर येथून अटक केली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी नितीन शिरसाठ, यांना यापूर्वी अटक झालेली असून. बबलू लोंढे हा अद्यापही फरार आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे.