शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भविष्यकाळ युवा पिढीचा - राजू शेटे पा .

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भविष्यकाळ युवा पिढीचा - राजू शेटे पा .

*शिवसेना पक्षाच्या माध्यमातून भविष्यकाळ युवा पिढीचा – राजू शेटे पा.*

 

*आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. – देवेंद्र लांबे पा.*

 

 

            राहुरी येथे शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे पा.,शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.,मधुकर तारडे,अॅड.चंद्रशेखर शेळके, दादासाहेब खाडे,अनिल आढाव,सागर मोरे,अंकुश पवार,विजय तोडमल आदी उपस्थित होते.

 

            याप्रसंगी राजूभाऊ शेटे म्हणाले कि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे कामे मार्गी लागत आहेत.श्री.एकनाथ शिंदे यांना हिंदूरुधय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास लाभलेला आहे. आगामी काळात हिंदूरुधय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भगवे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. येणार भविष्यकाळ युवा पिढीचा आहे असे श्री.शेटे पा.म्हणाले.

 

          याप्रसंगी शिवसेना राहुरी ता.प्र.देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत.आगामी काळात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरुणांना श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडून देणे गरजेचे आहे. आपली माणसं मोठी करण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे असे श्री.लांबे पा. म्हणाले.या प्रसंगी निवेदक महेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले.आभार संतोष धसाळ यांनी मानले.

 

           या प्रसंगीसंदीप थोपटे, ज्ञानेश्वर धसाळ,भाऊ काळे,शरद डुकरे,राहुल तमनर,दिनकर बाठे,महेंद्र शेळके,किशोर गाडे,गणेश खिलारी,योगेश नालकर,आकाश हरदे,अक्षय शरमाळे,रामेश्वर साळुंखे,अनिरुद्ध मोरे,किशोर पवार,अविनाश क्षिरसागर,पै.सुनील खपके,सुमित गोंदकर,विजय उंडे,बाळासाहेब वाघ,रवींद्र राऊत,रवींद्र पठारे,रमेश आढाव,प्रवीण बाचकर,अशोक कारले,नामदेव कोकाटे,नरेंद्र चव्हाण,नितीन कदम,अतुल म्हसे,अभी दांगट,नाना जरे आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.