बालाजी देडगाव येथिल कै. द्रोपदाबाई परशुराम कडू यांच्या निधनाने कडू पाटील कुटुंबाचा आधारवड हरपला.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री परशुराम मोहनीराज कडू यांच्या पत्नी कै. द्रोपदाबाई परशुराम कडू यांच्या जाण्याने कडू पाटील कुटुंबाचा आधारवड हरपला .तर त्यांच्या जाण्याने देडगाव व बाभुळखेडा या गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अतिशय गरिबीचा असणारा प्रपंच तसे ते बाभूळ खेडा या गावचे परंतू खुप दिवसांपासुन जामीन घेतल्याने ते देडगाव येथे वास्तव्यास आहेत. दोघा जोडीनं गुण्यागोविंदानं नीटनेटका प्रपंच संभाळला. घरामध्ये तीन मुले व दोन मुली यांच्या रूपाने घरामध्ये नवचैतन्य फुलू लागलं. जुन्या विचारांचे असतानाही नवीन विचारधारा या मातोश्रींना मनात बाळगली . घरात काटकसर करत मुलांना उच्चशिक्षित बनवलं .दोन मुलं नोकरीला, एक प्रगतशिल शेतकरी ,तर मुलींचे थाटामाटात लग्न करून दिली. गरिबीचा संसार थाटता थाटता चांगले सोन्याचे दिवस आले होते . परंतु काळाला काही मान्य नसल्याने देडगाव येथे कडू पाटील वस्तीवर कै. द्रोपदाबाई यांनी राहत्या घरी २४ ! ५ !२०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. व सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन गेल्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला व देडगाव परिसर हळहळला.
आगदी नम्र व सहनशीलता असणारा स्वभाव . चेहऱ्यावर कायम हस्यमय वातावरण असणार व्यक्तिमत्त्व .कधीही उच्च, निच्च जात ,पात न मानणार कर्तुत्व , अगदी आहे त्यात समाधान मानलं .कधीही गरीब-श्रीमंतिचा वाव न आणणारी ,सर्वांना सोबत घेऊन चालणारी अतिशय साधा सरळ पोशाख अंग भरून नऊवारी साडी डोक्यावर कायम पदर ,कपाळावर भरदार आस मळवट भर कुंकू दागिन्याचा कधीही मोहन नाही. कधी कुणाला वाईट न बोलता सर्वांना सुख देणारा व्यक्तिमत्व असं मातृत्व जाण्यानं घरात कायम मातोश्री ची पोकळी निर्माण झाली.
यांच्या पश्चात पती परशुराम मोहनिराज कडु, तीन मुले बाळासाहेब परशूराम कडु, सुरेश परशुराम कडू, संभाजी परशुराम कडू ,दोन मुली मीराबाई अशोक कोलते, चंद्रकला देविदास वागचौरे व सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.
टीप - कै. द्रोपदाबाई परशुराम कडू यांचा दहावा गुरुवार दि.२ / ६ / २०२२ रोजी रामेश्वर मंदिर कायगाव टोका( प्रवरा संगम) येथे ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे यांच्या प्रवचनाने होईल.