अखेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विषय आ. कर्डिले यांच्या मध्यस्तीने सुटण्याच्या मार्गावर .
*अखेर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा विषय आ.कर्डिले यांच्या मध्यस्तीने सुटण्याच्या मार्गावर*
*मराठा एकीकरणचे देवेंद्र लांबे पा.यांच्या प्रयत्नांना यश*
राहुरी येथे गुरुवार दि.१६ रोजी राहुरी विधानसभेचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्या विषयी शासकीय अधिकारी व मराठा एकीकरण समिती शिवस्मारक समितीच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीस तहसीलदार नामदेव पाटील,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,महामार्ग प्रकल्प अभियंता अलोक सिंग,सार्वजनिक बांधकामचे श्री.सय्यद,रा.न.पा.चे अभियंता पराग दराडे,मराठा एकीकरण तथा शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.,भा.ज.पा.चे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर,मा.विरोधी पक्ष नेते दादा पाटील सोनावणे,मा.उपनगराध्यक्ष रावसाहेब तनपुरे,व्यापारी असोचे अध्यक्ष प्रकाश पारख,कांतीलाल जगधने,सर्जेराव घाडगे उपस्थित होते.
या प्रसंगी आ.शिवाजी कर्डिले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधी मंजूर करून दिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नगर मनमाड रस्त्याच्या कडेला जुन्या पाण्याच्या टाकीच्या ठिकाणावर व्हावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा एकीकरण समिती सह शिवशंभू प्रेमींनी केलेली आहे.याच मागणीचा विचार करता पाण्याची टाकीच्या जागेचे मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्याची सूचना आ.कर्डिले यांनी केली.
या बैठकीस मराठा एकीकरण समिती तथा शिवशंभू प्रेमीच्या वतीने सतीश घुले,बंडू म्हसे,बलराज पाटील,अरुण निमसे,महेंद्र शेळके,अशोक तनपुरे,सतीश फुलसौंदर,रोहित नालकर,विक्रम भूजाडी,सतीश चोथे,अविनाश क्षीरसागर,नारायण धोंगडे,गणेश खैरे,शरद येवले,सचिन मेहेत्रे,उमेश शेळके,शिवाजी डौले,अक्षय तनपुरे,किशोर येवले,बाबा शिंदे,भाऊसाहेब पवार,चांगदेव भोंगळ,राजेंद्र दरक,राम शिंदे,अरुण डौले आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेवर व्हावा यासाठी शिवसेना तालुका प्रमुख यांनी मराठा एकीकरण समितीच्या माध्यमातून देवेंद्र लांबे पा. यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरला होता.अनेक वेळा आंदोलने देखील करण्यात आले होती.आ. शिवाजी कर्डिले यांनी आमदार होताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या बद्दल मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांकडून समाधान व्यक्त केले आहे.*
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याविषयीची बैठक समाप्त होताच शासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ जागेच्या मोजमाप करण्यासाठी लगबग सुरु केली.कामदार आमदार शिवाजी कर्डिले असल्याची चर्चा राहुरी शहरात सर्वत्र सुरु होती.*