आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना चारा पिकांचे बियाणे व कृषी अवजारे वाटप कार्यक्रम संपन्न .
*आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना चारा पिकांचे बियाणे व कृषी अवजारे वाटप कार्यक्रम संपन्न*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने मौजे- निंबोनी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे बियाणे व कृषि अवजारे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चारा पिके संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप लांडगे, नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आदित्य देशपांडे व चारा पिके प्रकल्पातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. दीपक पालवे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात चारा पिके संशोधन प्रकल्पाच्या आदिवासी उपयोजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून आदिवासी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ओट व बरसिम या चारा पिकांचे बियाणे व मनुष्यचलित सायकल कोळपे तसेच कृषिदर्शनींचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योजनेतील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी निंबोणी व श्रावणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,कृषी सहाय्यक श्री. सुहास भालेराव, श्री. अरुण कदम, श्री. योगेश पाडवी तसेच प्रगतिशील शेतकरी व या योजनेत लाभ मिळालेले 30 लाभार्थी आदिवासी शेतकरी उपस्थित होते.