प्रत्येकाच्या जीवनात कृतज्ञता हा गुण असावा :- प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ

प्रत्येकाच्या जीवनात कृतज्ञता हा गुण असावा :-  प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ

प्रत्येकाच्या जीवनात कृतज्ञता हा गुण असावा -प्राध्यापक लक्ष्मण बिटाळ

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याच्या अंगी कृतज्ञता हा गुण असावा.आपले आई वडील,शिक्षक,अडचणीच्या काळात मदत करणारे मित्र यांच्या उपकाराची जाणीव ठेवून व्यक्तीने कृतज्ञ असावे असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी शिक्षक दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये केले.आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय,शेवगाव या ठिकाणी आज ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष,आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ,प्रमुख अतिथी विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राचार्य अशोकराव नवल,मा.प्राचार्य चंद्रकांत आहेर,विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संपतराव दसपुते,उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर,शिक्षण विभाग सदस्य अशोक आहेर,पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे शिक्षकदिनी विद्यार्थी उपप्राचार्यांची भूमिका पार पाडलेली कु.श्रुती धावणे,पर्यवेक्षक भूमिका पार पाडलेला विद्यार्थी शिक्षक सुनील चव्हाण, ध्रुव चित्ते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .

      प्रा.बिटाळ आपल्या मनोगतात म्हणाले,की शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जात असतो.व्यक्ती विद्यार्थी दशेत असताना त्याला अनेक गुरु मिळत असतात. ते आपल्यातील दुर्गुण कमी करून आपले आयुष्य घडवण्याचे काम करत असतात.प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी जीवनाला कलाटणी देणारा शिक्षक असतो. शिक्षक दिन कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले तसेच उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

        यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

      तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गुणगौरव करण्यात आला.विद्यार्थी शिक्षक झिरपे भक्ती,गोलांडे ज्ञानेश्वरी,चव्हाण सुनील,इंगळे श्रावणी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच शिक्षक प्रतिनिधी प्रा . अशोक तमनर यांनी आपले विचार व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य चंद्रकांत आहेर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले,की गुरु नेहमी आपल्या आदरस्थानी असावेत.आपल्या आई-वडिलांनंतर आपले शिक्षकच योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करावे. 

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी माजी प्राचार्य,अशोकराव नवल यांनी भारतातील गुरु -शिष्य परंपरेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

        विद्यार्थी शिक्षक भूमिका पार पाडलेल्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या प्राध्यापकांना विश्रांती देत प्रत्यक्ष अध्यापनाची अनुभूती घेतली.कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी शिक्षकांनी आज शिक्षकाची भूमिका बजावली.

    सदर शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जयंती अकोलकर व शिवानी अकोलकर यांनी केले तर आभार कु.श्रद्धा शिंदे हीने मानले.