अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराला सांगून त्याचा गळा दाबुन खूण करण्यात आला.

राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे

ही घटना दि. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता राहुरी तालुक्यातील कणगर येथे घडली. राहुरी पोलिस पथकाने आरोपी पत्नी व तीच्या प्रियकराला ताबडतोब अटक करून जेरबंद केले. 

            राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात वन विभागाच्या जागेत दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, संभाजी बडे, चालक शकूर सय्यद आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या बाबत सुरवातीला आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र सदर इसमाचा खूण झाला असावा असा संशय आल्याने पोलिस पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पहाटेच्या सुमारास मयताची पत्नी अनिता सुधाकर थोरात हिला भेंडा येथुन ताब्यात घेतले. तीने दिलेल्या माहितीच्या आधारे तीचा प्रियकर आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर मांडवा येथून ताब्यात घेतले. पोलिस पथकाने आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कबूली दिली. 

         मयत सुधाकर किसन थोरात, वय ४० वर्षे, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर यांची पत्नी अनिता हिचे आरोपी ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधात मयत सुधाकर हा अडसर ठरत होता. त्यामुळे अनिता हिच्या सांगण्यावरून आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकर यांना दि. २२ जानेवारी रोजी साकूर मांडवा येथून दवाखान्यात जाण्याचा बहाणा करून राहुरी येथे घेऊन आला. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर हा सुधाकरला कणगर परिसरातील वन विभागाच्या जागेत घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने उपरण्याने सुधाकर यांचा गळा आवळून खूण केला, आणि तेथून पसार झाला होता. अशी माहिती मिळाली आहे.

         या घटने बाबत दुपारी उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मात्र या घटनेने तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.