इंडियन नॅशनल काँग्रेस ब्रिगेड संघटने च्या महाराष्ट्र प्रदेश कमिटी वर चंद्रशेखर कडु पाटिल यांची निवड.
काल वर्सोवा अंधेरी येथील इंडियन नॅशनल काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमिटीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष ठाकुर विपिन सिंह राजावत यांच्या हस्ते श्री चंद्रशेखर कडू पाटील यांना यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश कमिटी वरून काल भारताच्या राष्ट्रीय कमिटीवर घेतले आहे. तसे अधिकृत नियुक्ती पत्र काल राष्ट्रीय अध्यक्ष ठाकुर बिपिन सिंह राजावत यांनी श्री चंद्रशेखर पाटील यांना दिले. यावेळी ब्रिगेड चे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रभारी राजेश जी भोसले साहेब, महाराष्ट्राच्या महिला ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष उदगीर येथील बालिका मुळे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य पल्लवी का पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव सिद्धी कामथ, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता बलवीर धिल्लो, मुंबई प्रदेश अध्यक्ष आमिर अली कडीवाला, प्रदेश सोशल मीडिया अध्यक्ष दीपिका बढे, मीरा रोड विभाग सचिव अमित गुजराती हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर विपिंग सिंह राजावत यांनी सांगितले की देशपातळीवर असणारे पद दिले, परंतु आता कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश असल्यामुळे भारतात कुठेही कार्यक्रमासाठी येणे बंधनकारक आहे. -:चौकट:- *पक्ष संघटनेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. त्यासोबतच संघटनेचे संपूर्ण देशात जाळे उभा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. आज आपण महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली ती आपण बघतोच आहोत. महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही सत्तेपासून दूर राहवे लागणाऱ्या भाजपची पाण्याविना मासा अशी अवस्था झाली आहे. आणि याच वैफल्यग्रस्त तेतून ते सरकारला कुठल्याच प्रकारचे काम करू देत नाहीये. तसेच महाराष्ट्रात अस्थिरता माजवण्यासाठी भाजपने काही खास माणसे नेमली आहेत. सर्वसामान्य जनतेच्या महागाई सारख्या प्रश्नाकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी अनेक नको असणारे मुद्दे समोर येत आहेत. चर्चा फक्त त्यावरच केली जाते. केंद्र सरकारच्या अपयशावर कुणी बोलूच नये यासाठी भाजप पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आज आपण बघितलं शेंगदाणे सारखे भाव ,गोड तेलाचे भाव, पेट्रोल डिझेल गॅस या सर्वांच्या किमती गगनाला भिडत चालल्या आहेत. यावर कुठल्याच प्रकारची चर्चा होऊ द्यायची नाही म्हणून भाजप कडून पूर्ण प्रयत्न चालू आहे. परंतु काँग्रेस ब्रिगेडच्या माध्यमातून या सर्वांचा पर्दाफाश आता आम्ही करणार आहोत. भाजपच खरं स्वरूप जनतेसमोर आणून भाजपला आता देशभरात आम्ही उघडे पाडणार आहोत.* -