गायरान जमिनिवरील अतिक्रमणाबाबत तहसीलदार संघटणा इतर पक्षाच्या पुढार्यांनी मागासवर्गीयांची दिशाभूल थांबवावी - राजुभाऊ आढाव.
मा. जिल्हाअधिकारी साहेब अहमदनगर यांनी त्यांचे कार्यालयातून पत्र क्र- महा /- कार्या / जमिन-२ ब/१४२८/ २०२२.दि- २३/०९/२०२२ रोजी बजाऊन प्रत्येक गावागावातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यासाठी प्रांतअधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती नियुक्त केली असून त्यांच्या माध्यमातून अतिक्रमण मुक्त करण्याची प्रक्रीया राबवीण्याचे ठरवलेले असल्याने त्यानुसार अतिक्रमण धारकांना नोटीसा बजाऊन स्वत:हुन दहा दिवसात अतिक्रमण हटविण्याची संधी देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की. शासनाच्या मालकीच्या गायरान जमिनिवरील अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत नवी दिल्ली येथील मे. सर्वोच्च न्यायालयाकडील सिव्हील अपिल क्र.११३२/२०११ एस एल पी , एस एल सी ( सी )३१०९/२०११ जगपाल सिंग व इतर विरुद्ध पंजाब सरकार व इतर या प्रकरणात न्यायालयाने दि.२८ जानेवारी २०११ रोजी निर्णय देऊन देशातील सर्व राज्य सरकारांना आदेशाचे पालन करून वेळच्या वेळी अतिक्रमण काढण्याचे कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे बंधन घालून दिलेले आहे.
पूढे सर्वोच्च न्यायालयाने अशेही आदेश दिलेले आहे कि.२८/१/२०११ च्या निर्णयाप्रमाणे आणी राज्य शासनाच्या प्रधान सचिव महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय दि.१२ जुलै२०११ रोजीच्या पत्रातील नमुद अनुसुचित जाती / जमाती भूमीहीन शेतमजूर व्यक्ती इत्यादींचे अतिक्रमण नियमाकुल करणेबाबत निर्णय झालेला असल्याने अशा व्यक्तीना आलेल्या नोटीसीस मुदतीत उत्तर देणे क्रमप्राप्त आहे.
या संदर्भात जनतेने कोणत्याही पुढार्या च्या नादी लागून मे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सन्मानपूर्वक पालन करणे गरजेचे आहे.
यामध्ये धनदांडग्यांचे मोठ्या प्रमाणात शासनाच्या जमिनिवरील शेकडो हजारो एकर अतिक्रमणास पाठबळ देऊन गोरगरीब जनतेने कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लुटी पासून सावध राहने गरजेचे आहे व धनदांडगे लोक यामध्ये गोरगरिब जनतेस पुढे घालून स्वतकेलेल्या शासकीय जमिनिवरील हजारो एकर जमिन गिळंकृत करू पाहताहेत या बाबत सविस्तर (राजु आढाव अहमदनगर जिल्हा प्रमुख रिपब्लीकन सेना ) (बाबासाहेब साठे अ.नगर जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी) ( रोहीदास अडागळे जिल्हा प्रमुख अहमदनगर अपंगसेल रिपब्लीकन सेना ) यांचेशी संपर्क करावा.
असे राजु आढाव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगीतले यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार मंडळी येथे उपस्थीत होते.