रेल्वेच्या कारवाईला दानवेंकडून स्थगिती, खा.सुजय विखेंच्या प्रयत्नांना यश.
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- रेल्वे लाईनच्या विस्तारामुळे व मालधक्क्याच्या प्रस्तावित स्थलांतरामुळे विस्थापित होऊ पाहणा-या नागरीकांवर अन्याय होऊ नये म्हणून खा.सुजय विखेंच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे केंद्र तयेच सोलापूर विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सिद्धरमैय्या सालीमठ, वनविभाग अधिकारी यांचेसोबत भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांच्या प्रयत्नाने भाजपचे केतन खोरे, कामगार नेते नागेश सावंत, आपचे तिलक डुंगरवाल, संजय गांगड यांची ॲानलाईन बैठक पार पडली.
नुकत्याच संपन्न झालेल्या ॲानलाईन बैठकीत दिल्ली येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे व खा.सुजय विखे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.विखे पाटील म्हणाले की, रेल्वे विभागाच्या नोटीसीमुळे श्रीरामपूरातील नागरीक भयभीत झाली होते. हि कारवाई झाल्यास शेकडो नागरीकांची घरे व दुकाने उद्ध्वस्त होण्याची भिती होती. श्रीरामपूरच्या नागरीकांनी महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेतल्याने आपण या प्रकणात लक्ष घातले. रेल्वे विभागाने मालधक्याच्या जागेचे पुरावे जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे सादर करावेत त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारची संबंधित विभागांची कमिटी तयार करावी तसेच वन विभाग व खाजगी मालमत्ताधारक यांच्याकडील जागा रेल्वे विभागाची असल्याचे सिद्ध करावे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध कार्यवाही केली जाईल असा इशारा दिला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे म्हणाले की, खा.सुजय विखे पाटील यांनी मांडलेली बाजू योग्य असून रेल्वे प्रशासनाने जागेची शहानिशा करून कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वन विभाग, महसुल व रेल्वे विभागाच्या अधिका-यांची कमिटी स्थापन करण्याचे आदेश देत या कमिटीचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशा सुचना रेल्वे विभागाच्या अधिका-यांना दिल्या. सदर ॲानलाईन बैठकीसाठी खा.सुजय विखे पाटील यांचेकडे भाजप तालुकाध्यक्ष दिपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांनी पाठपुरावा केला.कामगार नेते नागेश यावंत व आपचे तिलक डुंगरवाल यांनी श्रीरामपूरच्या नागरीकांवर रेल्वे प्रशासनाने अन्याय करू नये कोणालाही विस्थापित होऊन देण्याची वेळ येऊन देऊ नये हि मागणी करत प्रस्तावित मालधक्क्यामुळे अनेक नागरीक विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देत परिसरात असणा-या शाळा, कॅालेज, हॅास्पीटल व रहिवाशांना मालधक्यावरील सिमेंट धुळीमुळे अनेकांना त्रास चालू झाले असून भवित्यात सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागेल. सदर मालधक्का एमआयडिसी किंवा ओव्हर ब्रीज या ठिकाणी भव्य मोठ्या स्वरूपात मालधक्का झाल्यास बाजारपेठेला, कामगारांना, व्यापाऱ्यांना व वाहतुकीला याचा मोठा फायदा नक्कीच होईल.तर बैठकीत भाजपचे केतन खोरे, संजय गांगड यांनी दत्तनगर हद्द संगमनेर रोड ते ओव्हर ब्रीज नेवासा रोड येथील विस्थापित होऊ शकणा-या नागरीकांच्या बाजूने ठोस भुमिका मांडली. यावेळी भाजप शहराध्यक्ष मारूती बिंगले, विकास डेंगळे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, योगेश जाधव, गणेश भडांगे, सुभाष भडांगे, भागवत घुगे, मुबारक शेख, आलिम शेख, हरिश काळे, सुरेंद्र विखे आदी उपस्थित होते.