उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणा-या संपूर्ण डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.

वर्धा

उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणा-या संपूर्ण डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.

उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणा-या संपूर्ण डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.                                      बी. पी. एस लाईव्ह न्युज नेटवर्क                                                 नागपूर/ वर्धा:-येथील स्वाती गुजर या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून पुर्ण शरिराचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक इजा भरून काढण्यासाठी पुढील वैद्यकीय उपचाराकरिता मुंबईला जावे लागणार आहे.

त्याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी अंदाजे ३०-३५ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. ही बाब त्यांनी रुग्णालय प्रशासना समोर मांडली असता त्यांनी कसलीही दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजाने त्यांना जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसावे लागले. स्वाती गुजर यांचा पुढील वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च आचार्य विनोबा भावे रुग्णालयांनी करावा. उपचारादरम्यान हलगर्जीपणा करणा-या संपूर्ण डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. रुग्णालयातील कामकाजाबद्दल निष्पक्ष चौकशी करावी व चौकशी अहवाल येई पर्यंत तेथील मोठे वैद्यकीय आँपरेशन थांबविण्यात यावे.