मुस्लिम धर्मगुरुची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास दोन गावठी कट्यासह पकडले , राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी .

मुस्लिम धर्मगुरुची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास दोन गावठी कट्यासह पकडले , राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी .

अफगाणिस्तान मुस्लिम धर्म गुरुची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास राहुरीत अटक .दोन गावठी कट्यासह पाच जिवंत काडतुसासहित पकडले .

 

             अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका बुधवार सकाळपासून पोलिसांच्या धडक कारवाईने राज्यभर गाजत आहे .एका मागे एक होणाऱ्या धडक कारवाईमुळे राहुरी पोलिस अधिकाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे .

            नाशिक जिल्ह्यातील येवला येथील अफगाणिस्तानातील मुस्लिम धर्मगुरु सुफी जरीफची हत्या करणाऱ्या संशयित मारेकऱ्यासह त्यांच्या साथीदारांच्या राहुरी पोलिसांनी झडप घालून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी कट्यासह पाच जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात आली आहे. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे (वय २७) राहणार समता नगर कोपरगाव, गोपाल लिंबा बोरगुले (वय २६) राहणार चवडी जळगाव तालुका मालेगाव, विशाल सदानंद पिंगळे (वय २३) राहणार कोपरगाव असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगांराची नावे आहेत.

         बुधवारी सकाळपासून एक मोठ्या कारवाईत राहुरी पोलीस व्यस्त असताना हि कारवाई आटोपून जेवण करण्यासाठी राहुरी पोलीस घरी निघाले असता तोच दबंग पोलीस अधिकारी सज्जन नाऱ्हेडा यांना नगर- मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जावर गावठी कट्यासह सराईत गुन्हेगार जेवण करण्यासाठी बसल्याची गुप्त माहीती मिळाल्यानंतर नाऱ्हेडा यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना हि माहीती दिल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा या कारवाईकडे वळवला. राञी १० वाजण्याच्या सुमारास हॉटेल सर्जावर जेवण करण्यासाठी बसलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी झडप मारली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतुसे देखील आढळून आली. हा संपूर्ण थरार हॉटेलमध्ये असलेल्या ग्राहकांनी बघितल्यानंतर एकच तारांबळ उडाली होती. कुख्यात गुन्हेगारांना पकडल्यानंतर उपस्थित ग्राहकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

             नाशिक जिल्ह्यातील येवला हद्दीत अफगाणिस्तान येथील मुस्लिम धर्मगुरु सुफी जरीफ हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर घटनेने देशभरात खळबळ उडाली होती या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणे कडे हा तपास वळविण्यात असल्याचे देखील चर्चा आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणुन संतोष हरिभाऊ ब्राह्मणे हा येवाला पोलीसांना हवा होता. याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा ( NIA) यांच्याकडे हा तपास वर्ग होणार होता. या तपास यंञेनेला हा आरोपी हवा होता. मात्र तो मिळून येत नव्हता. राहुरी पोलिसांनी धाडसी कारवाई करत सदर मारेकऱ्यास बेड्या ठोकल्या आहे.याबाबद आनखी नवीन उलगडा होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

              पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, अजिनाथ पाखरे, नितीन शिरसाठ लिपाने, कुटे, कांबळे,आदींच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहे .