वकील आपल्या दारी उपक्रमाचे पुणे येथे आयोजन, दर्द से हमदर्द ट्रस्टच्या वतीने_मोफत कायदेशीर सल्ला.

वकील आपल्या दारी उपक्रमाचे पुणे येथे आयोजन, दर्द से हमदर्द ट्रस्टच्या वतीने_मोफत कायदेशीर सल्ला.

     दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि विधी प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यात २८ फेब्रुवारी २०२५, ०१ मार्च २०२५, आणि ०२ मार्च २०२५ या तीन दिवसात लीगल ऐड ऑन व्हील्स ( वकील आपल्या दारी) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

          या उपक्रमात २८ फेब्रुवारीला २०२५ रोजी पुणे येथील कामगार पुतळा शिवाजी नगर येथे legal aid on wheels ( वकील आपल्यादारी )च्या वाहनाचे स्वागत करण्यात आले व कामगार पुतळ्यातील सेवा वस्तीत ३० पेक्षा जास्त लोकांचे कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दर्द से हमदर्द ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश साळसिंगीकर तसेक जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड प्रशांत यादव सर उपस्थित होते. तसेच विधी प्रकोष्ठचे प्रांत सह संयोजक अ‍ॅड सोहम यादव , अ‍ॅड संकेत राव DSHT चे पुणे प्रमुख अ‍ॅड खेतराम सोलंकी  सोबत अ‍ॅड ओमकार पाटील, अ‍ॅड नितीन हजारे, अ‍ॅड स्मिथ शिंदे , अ‍ॅड मनिष निकम आणि वस्तीतील विहिपचे सविता ताई आणि मातंगी ताई उपस्थित होत्या.

          ०१ मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते ६ Legal Aid on wheels (वकील आपल्या दारी)या उपक्रमाचे आयोजन चिंचवड शहरात करण्यात आले होते. या उपक्रमात २५ पेक्षा जास्त लोकांनी सहभागी होऊन आलेल्या वकिलांकडून मोफत कायदेशीर सल्ला घेतला. प्रसंगी दर्द से हम दर्द ट्रस्ट च्या वतीने अ‍ॅड सुशांत गोरडे आणि विधी प्रकोष्ठ आयामकडून अ‍ॅड सोहम यादव , अ‍ॅड राजेश्वरी रणपिसे , अ‍ॅड ऋषिकेश शर्मा उपस्थित होते.

          ०२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते ४ पुणे येथील औंध ( इंदिरा वस्ती) येथे legal aid on wheels ( वकील आपल्या दारी) चा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात २० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला आणि आपल्या कायदेशीर समस्याचे निवारण दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि विधी प्रकोष्ठच्या वकिलांकडून करून घेतले प्रसंगी दर्द से हैम दर्द ट्रस्ट चे पुणे प्रमुख अ‍ॅड खेतराम सोळंकी , अ‍ॅड नितीन हजारे तसेच विधी प्रकोष्ठचे अ‍ॅड संकेत राव, अ‍ॅड राजेश्वरी रणपिसे, अ‍ॅड ऋषिकेश शर्मा, अ‍ॅड मेघा रणपिसे उपस्थित होते.