भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने पुणे येथे उद्या शिव सन्मान परिषदेचे आयोजन.
अहमदनगर :भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दि. १५ सप्टेंबररोजी 'शिवसन्मान परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद सायंकाळी ४ वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मैदान, आरटीओ ऑफिसशेजारी, पुणे येथे होणार आहे.या शिवसन्मान परिषदेचे अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आहेत. विशेष अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटक ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आहेत. यावेळी ज्येष्ठ इतिहासकार मा. म. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, सिनेअभिनेते किरण माने, प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रदीप सोळुंके, अमरजित पाटील उपस्थित राहतील. या परिषदेला अहमदनगर जिल्ह्यातून संभाजी ब्रिगेड व भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय संसारे, व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष भागडे यांनी केले आहे.