खेडले परमानंद परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ धास्तावले.

खेडले परमानंद परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ धास्तावले.

खेडले परमानंद प्रतिनिधी दि 11 जानेवारी

खेडले परमानंद परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ धास्तावले.

        खेडले परमानंद परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली असून गावालगत लोक वस्ती मध्ये घुसून बिबट्या दहशत करत आहे.

         परिसरात अनेक कुत्रे ,शेळ्यांचा फडश्या दैनिक स्वरूपात पाडला जात असून 10 जानेवारीच्या रात्री फय्युम इनामदार यांच्या राहत्या घराजवळील शेड मधून जाळीची तटबंदी असतानाही एक शेळीचा जागेवर फरशा पाडला तर दुसरी ओढून नेल्याचा प्रकार घडला आहे.

        यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून वन खात्याकडून पंचनामा सोडून कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.

       संबंधित घटनेची दखल घेऊन वन विभागाने तातडीने

बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

        शालेय विद्यार्थी शेती काम करणारे शेतकरी,शेतमजूर अशा होणाऱ्या घटनेमुळे धास्तावून गेले आहे.यापूर्वी सुभाष कल्याण जाधव यांच्या वस्तीवर दिवसभर बिबट्याची दहशत सुरू होती. गावा लगतच्या लोकवस्ती परिसरात बिबट्याचा वाढता संचार धोकेदायक ठरत आहे या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे ..