दि. ०३/०९/२०२३ रोजी संत. फ्रान्सिस झेवियर, कॅथोलिक चर्च, टिळकनगर व पॅरिस कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन गौरव सोहळा साजरा करण्यात आला.
श्रीरामपूर - दि. ०३/०९/२०२३ रोजी संत. फ्रान्सिस झेवियर, कॅथोलिक चर्च, टिळकनगर व पॅरिस कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन गौरव सोहळा साजरा करण्यात आला. श्री. प्रभाकर पवार सर "येशू" या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते व चित्रपट अभिनेते, यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फादर मायकल वाघमारे सहाय्यक धर्मगुरू रेव्ह.फादर संजय पठारे यांच्या शुभहस्ते टिळकनगर धर्मग्रामातील व परिसरातील जवळजवळ 48 शिक्षक शिक्षिकेंचा गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कॅथोलिक मराठी शाळेचे माजी मुख्याध्यापक, श्री.पी. एस. निकम सर , शाळेची माजी विद्यार्थिनी दिपाली निकम मॅडम यांनी सर्व उपस्थित सन्मानित आजी माजी सेवा निवृत्त शिक्षक शिक्षिकांचे वतीने सदर कार्यक्रम आयोजकांचे व रेव्ह फा. मायकल वाघमारे यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे शाळेचे माजी विद्यार्थी व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.प्रभाकर पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माझा फार मोठा सन्मान मी समजतो कारण मी या शाळेचा माजी विद्यार्थी या शाळेतील शिक्षक शिक्षिकांचा शिक्षक दिनी सन्मान चिन्ह देवुन सन्मानित करण्यासाठी मला बोलवले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धर्मग्राम समितीचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र भोसले सर त्याचप्रमाणे सचिव, श्री. संदीप त्रिभुवन यांनी केले..........Delhil91.com bpslivelive news.. Reporter... Prakash Nikale... Shrirampur.