तुमची ना -लायक वृत्ती समजली आता फक्त हो किंवा नाही सांगा,आमची सहनशीलता संपली ,आमच्या जमिनी मागे द्या -विद्यापीठातील भरती बाबत प्रकल्पग्रस्तांचा संताप .

तुमची ना -लायक वृत्ती समजली आता फक्त हो किंवा नाही सांगा,आमची सहनशीलता संपली ,आमच्या जमिनी मागे द्या -विद्यापीठातील भरती बाबत प्रकल्पग्रस्तांचा संताप .

सध्या चर्चेत असलेल्या नोकरभरती पैकी महाराष्ट्रातील विद्यापीठ नोकरभरतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापनेवेळी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनि या कृषी विद्यापीठाने घेतल्या आहेत त्यांचे वारस रात्रंदिवस या प्रकल्पग्रस्त नोकरभरतीची अतुरतेने वाट पहात आहेत .

             विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी प्रकल्पग्रस्त भरतीसाठी लागणारी सर्व कारवाई पूर्ण केली असून सदरचा प्रस्ताव मंजूरी साठी मंत्रालय स्तरावर पडून आहे परंतू मंत्रालयात काही अधिकाऱ्यांचे टेबल असे आहेत की त्यावरून या फाईली महीना दोन महिने पुढे हालत नाही .आचारसंहितेचे सावट काहीसे दूर झाल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे याकडे लक्ष लागुन आहे .काही प्रकल्पग्रस्तांच्या वयाची मर्यादा संपुष्टात आली आहे तसेच ज्यांचं वय संपुष्टात आले आहे त्यांचे दाखलेही जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्यास बंदी घातलेली आहे . प्रकल्पग्रस्तांची अशा प्रकारे सरकारने एक प्रकारे कोंडी निर्माण केली आहे .यावर प्रकल्पग्रस्त गप्प बसणार नाही हे ही तितकेच खरे आहे .

              विद्यापीठात जाणीवपूर्वक रखडवलेली प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया व जनरल भरती तात्काळ सुरू नाही केली तर येणाऱ्या निवडणूकीत धडा शिकवणारच असा इशारा विद्यापीठ भरती प्रक्रियेकडे लक्ष ठेवून असणाऱ्या तरुणांनी दिला आहे .

           सरकार कोणत्याही चिरीमिरी योजनेकडे जनतेचे लक्ष केंद्रीत करून नोकर भरती टाळण्याचा प्रयत्न करीत असेल तर जनता गप्प बसणार नाही .शासनाने नोकरभरती करण्याचा विषय मार्गी लावून तरुणांना काम द्यावे अशी मागणी सध्या जनतेतून सूरू आहे.जनरल भरती पूर्वी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावून न्याय द्यावा अन्यथा लवकरच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जि भाऊ ठोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त प्रकल्पग्रस्त यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे .