नेवासा तालुक्यात भाजपला मोठे खिंडार भाजपचे शिलेदार शिवसेनेच्या तंबूत.
प्रतिनिधी
भाजपचे खंदे समर्थक, गेल्या अनेक निवडणुकीत नेहमी गडाखांच्या विरोधात असणारे व मा आ बाळासाहेब मुरकुटे यांचे अतिशय जवळचे नातेवाईक यांनी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश केला असून नेवासा भाजपला मोठे खिंडार पडले आहे . ज्यांनी मागील विधानसभेला भाजपची धुरा सांभाळली असे तालुक्यातील अनेकजण गडाखांच्या तंबूत आल्याने तालुक्यातील भाजपची अवस्था दयनीय झाल्याचे पाहण्यास मिळत आहे .
प्रभाकर बोरकर नेवासा बुद्रुक यांच्या वस्तीवर ना शंकरराव गडाख पाटिल यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला.
भाजपचा बालेकिल्ला असलेला नेवासा बुद्रुक परिसरात होत असलेले परिवर्तन हे नेवासा तालुक्यात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे . नेवासा बुद्रुक येथे ना शंकरराव गडाख यांनी खंडोबा देवस्थान तसेच विविध कामासाठी भरघोस निधी दिला आहे. यापूर्वी शनी शिंगणापूर, भानसहिवरा , शिंगवे तुकाई , खुपटी , कुकाणा, नेवासा सह तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला आहे . या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकीत गडाख यांना मोठा विरोध केला होता.
तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली आहे .मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे . माझ्यावर विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर आरोप केले तरी मी या मंत्रिपदाचा वापर तालुक्यातील जनतेची जास्तीत जास्त कामे सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे .
ना शंकरराव गडाख.