श्री. क्षेत्र साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती

राहाता--::
शिर्डी येथील श्री.क्षेत्र साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची बदली करण्यात आली असुन त्यांची विदर्भ येथील वैधानिक विकास मंडळ नागपूर येथे सदस्य सचिव या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या श्री क्षेत्र साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या कडे साई संस्थानचा पदभार सोपविण्यात आला होता.परंतु आजच सरकारच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन राज्याला परिचित असलेले श्री. तुकाराम मुंढे यांची श्री. क्षेत्र साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून यापुढे श्री. क्षेत्र साईबाबा संस्थानचा सर्व कारभार श्री.तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे. . !