झांगडगुत्ता बाहेर येईल या भितीपोटी माहितीची ता.राहुरी विद्यापाठात लपवा लपवी मा.आयुक्तांच्या आदेशाला फासला हरताळ.

झांगडगुत्ता बाहेर येईल या भितीपोटी माहितीची ता.राहुरी विद्यापाठात लपवा लपवी मा.आयुक्तांच्या आदेशाला फासला हरताळ.

कामांबाबत खरी माहिती दिल्याने आपण गोत्यात येणार या भीतीपोटी १ जानेवारी २०१७ ते १६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत विद्यापीठ कॅम्पस मध्ये असणारे क्रीडा भवन जिमखाना या ठिकाणी झालेल्या कामांची माहिती विद्यापीठ अभियंता यांनी बाहेर येऊन दिली नाही या कालावधीत अनेक वेळा विद्यापीठाच्या जिमखाना येथे स्थापत्य आणि विद्युत चे लाखो रुपयांचे निकृष्ट कामे होत असल्याचे निदर्शनात आले टेंडर किंवा कोटेशन नोटीस नसताना कामे कोणाच्या भल्यासाठी चालू आहे याची उत्सुकता लागल्याने १६ /११/२०१७ रोजी तृशांत त्रिभुवन यांनी माहिती अर्ज केला होता कामे कशी होतात कामांवर ना ठेकेदाराचा पत्ता ना अभिायंत्याचा पत्ता अशा अवस्थेत लाखो रुपयांचे कामे चालू असल्याने माहिती मागवली माहिती बाहेर गेल्याने भ्रष्टाचार बाहेर येईन याची खात्री असल्याने विद्यापीठ अभियंता यांनी माहिती बाहेर येऊ दिलीच नाही माहिती अर्जाबाबत सुनावणी नाशिक खंडपीठा समोर झाली माहिती न दिल्यामुळे विद्यापीठ अभियंता यांच्यावर ताशेरे ओढत पंधरा दिवसाच्या आत जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता ऐ. जे. भगत यांना माहिती देण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिले होते परंतु मिलिंद ढोके विद्यापीठ अभियंता यांनी माहिती बाहेर गेल्याचे धोके ओळखून तत्परता दाखवत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन अंग झटकण्याचे प्रयत्न केले खरी माहिती बाहेर येणार नाही याची खास दक्षता घेतलेली दिसुन येते खरी माहिती बाहेर आल्यास आपण गोत्यात येऊ अशी खात्री आसुन या भीतीपोटी आयुक्तांच्या आदेशाला ही विद्यापीठ अभियंता यांनी हरताळ फासला आहे आयुक्त साहेबांनी आदेश देताना कुलगुरू यांना सहाय्यक अभियंता यांच्यावर कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते कुलगुरू यांनी कार्यवाही केली की नाही हे जरी गुलदस्त्यात असले तरी कुलगुरूंनी अधिकाऱ्यांच्या चुकाबद्दल विद्यापीठाच्या नावाला शोभेल अशी कारवाई केली असती तर विद्यापीठ अभियंता यांनी चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिलीच नसती असे काही जाणकार सांगतात तर आपल्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याने आपल्याला काही होणार नाही प्रशासन आपली बाजू सावरून घेईन या विश्वासात अभियंता असल्याने माहिती देण्यात फसवणूक केली असल्याची चर्चा विद्यापीठ अभियंता कार्यालयात आहे सध्या तरी विद्यापीठात कुंपणच शेत खात असल्याचे चित्र असून वरिष्ठांच्या कृपाशिर्वादामुळे सध्या कामकुचार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुगीचे दिवस आल्याची मिश्किल चर्चा विद्यापीठात आहे.