नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथिल सौ. दिपाली गणेश मुंगसे यांची औरंगाबाद PSI पदी नियुक्ती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रगतशील बागातदार शेतकरी गोरक्षनाथ मुंगसे लालगेट यांची सून व उच्च शिक्षीत तरुण गणेश गोरक्षनाथ मुंगसे यांची सुविद्य पत्नी सौ. दिपाली गणेश मुंगसे यांची औरंगाबाद येथे पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
हा कार्य गौरव सन्मान सोहळा कार्यक्रम देडगाव येथिल लालगेट वस्तीवर पार पडला .या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटील सोनवणे ही लाभले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील मुंगसे यांनी केले. तर ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब मुंगसे, व बाळासाहेब पाटील सोनवणे यांनी पीएसआय दिपाली ताई यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आपली मनोगत व्यक्त केली .
यांनतर पि. एस. आय. दिपाली ताई यांनी आपल्या भाषणातून आपल्या जीवनाचा अनुभव सांगितला. माझे आई वडील अतिशय गरीब कुटुंबातील माझे शिक्षण बीड जिल्ह्यातील आष्टी तालु क्यात झाले. माझे गाव कुंबेफल मी अतिशय खडतर प्रवास करत आतापर्यंत यशस्वी होत गेले. मला कधी कधी पुस्तक नसायचे पण मला मित्रांनी सहकार्य केले. व मी पि एस आय होण्यात माझ्या पतिदेव, सासुसरे, आई वडील यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी माझ्या पतीमुळे जीवनात यशस्वी झाले. हे सांगताना ताईचे डोळे भरून आले.
या कार्यक्रमाला प्रमुख देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, नारायण पाटील घोगरे ,भारत शिंदे सरपंच कुंबेफळ, मारुती मुळे कुंबेफळ, आसाराम निकम, शिवनाथ बोरुडे, किशोर चामुटे, नाना पटारे ,पांडुरंग महाराज रक्ताटे,व सर्व जय हरीभजनी मंडळ, आबासाहेब चव्हाण, नवनाथ गडाख, आप्पासाहेब ससे, विजय चेडे ,बाबासाहेब बनगे ,गणपत तात्या मुंगसे, युवा नेते उद्धव मुंगसे, बागातदार शेतकरी बाळासाहेब मुंगसे, राजेंद्र पाटील मुंगसे टेलर व परिसरातील महीला भगि निही व देडगाव परिसरातील मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक युनूस पठाण केले तर आभार बाळासाहेब मुंगसे यांनी मानले.