महाराष्ट्रातील थोर शिक्षणाचे प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील सारखेच मा .बाजीराव पाटील मुंगसे अण्णा यांचे कार्य.

महाराष्ट्रातील थोर शिक्षणाचे प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील सारखेच मा .बाजीराव पाटील मुंगसे अण्णा यांचे कार्य.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ज्येष्ठ समाज सुधारक ,ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा) यांचा अभिष्टचिंतन सोहळा (वाढदिवस) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके होते तर ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग भूषण पुरस्कर्ते भाऊसाहेब सावंत सर यांनी केले .तर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील थोर शिक्षणाचे प्रसारक ज्यांनी शिक्षणाचे मोठे कार्य केले असे कर्मवीर भाऊराव पाटील यांनाही लोक प्रेमाने (अण्णा )म्हणत होते .चांगले कर्म केल्याने त्यांना कर्मवीर ही पदवी मिळाली .तसेच या देडगावात शिक्षणाचा या ज्ञानाच्या विद्यापीठाचा पाया माननीय अण्णांनी रचला व ज्ञानाचं विद्यापीठ उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला म्हणून सर्वसामान्यांची मुलं आज मोठमोठ्या पदवीपर्यंत (नोकरी पर्यंत)पोहोचले ही अण्णांच्या कार्याची गावावर कृपा आहे .म्हणून देडगाव तील कर्मवीर बाजीराव पाटील मुंगसे आहेत अशा शब्दात त्यांचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

      यावेळी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, युवा नेते हरिभाऊ तागड आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून अण्णांना शुभेच्छा दिल्या.

         या कार्यक्रमास अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य भाऊराव मुंगसे सर ,माजी चेअरमन भानुदास पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनील शेठ मुथा, संचालक संजय मुंगसे, देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचे संस्थापक सागर सर बनसोडे, मा. दत्ता पाटील मुंगसे,शिवाजीराव मुंगसे ,ग्रामपंचायत सदस्य सचिन मुंगसे ,महादेव पुंड ,संभाजीराजे काजळे ,दत्तात्रय कदम, गणेश मुंगसे सर, भारत औटी, संचालक जनार्दन मुंगसे , गणेश औटी,रमेश काजळे ,बन्सी वांढेकर ,बंडू बनसोडे, वेदांत मुंगसे ,ओमकार मुंगसे ,चेअरमन हरिभाऊ कदम ,संचालक संदीप कुटे, बजरंग दलाचे उपाध्यक्ष शिवाजीराव काजळे ,टाके फिटर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नवनाथ फुलारी, अनिल पेठे सर,

राजू बनसोडे सर,व विविध संघटनेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघ , ग्रामपंचायत देडगाव, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, दुग्धविकास संघ, पत्रकार संघटना, बजरंग दल ,शैक्षणिक संस्था,गावातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        

         या सर्वांच्या , उपस्थितांच्या हस्ते बाजीराव पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. या फोटो शूटिंग आनंद ससे यांनी केले.

   

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार चंद्रकांत मुंगसे यांनी मानले.