*आगाशेनगर येथे जेष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क व जिमचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
*आगाशेनगर येथे जेष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग पार्क व जिमचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
आज दि. ०५/११/२०२२ रोजी ग्रामपंचायत दत्तनगर मधील आगाशेनगर येथे जेष्ठ नागरिकांसाठी आमदार निधी व ग्रामपंचायत निधी मधून व प्रयत्नाने राखीव जागेत जॉगिंग पार्क व जिमचे उद्घाटन माननीय लोकनियुक्त सरपंच श्री सुनील भाऊ शिरसाठ, उपसरपंच श्री प्रेमचंद कुंकूलोळ, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनील जगताप सर,श्री.किरण खंडागळे, श्री. प्रदीप गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सदर जॉगिंग पार्क व जिमचे उद्घाटन हे रेव्ह. फादर थॉमस डी पाॅल इंग्लिश मिडीयम स्कूल व आगाशेनगर भागातील बरेच सरकारी कर्मचारी सेवा निवृत्त झाले असे व इतर ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच श्री. सुनील भाऊ शिरसाठ यांनी असे सांगितले की त्यांच्या काळामध्ये सर्व दत्तनगर ग्रामपंचायत क्षेत्रात खूप भरीव अशी कामे झालेली आहेत. सिमेंट रस्ते, स्ट्रीट लाईट, अंडरग्राउंड गटारी तसेच आज जेष्ठ नागरिकांसाठी जिम व जाॅगींग पार्कचे उद्घाटन करताना त्यांना खूप आनंद होत आहे. असे नमूद केले . भविष्यात स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा होण्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना लवकरच नळ योजना व फिल्टर पाणी तलावाचे काम सुरू होईल असे त्यांनी आश्वासन श्री. सुनिल भाऊ शिरसाठ यांनी दिले.
यावेळी मोठ्या संख्येने आगाशेनगरचे नागरिक उपस्थित होते. श्री. जगताप काका, सौ. जगताप मावशी,श्री व सौ. बुज्जा साहेब, श्री. साळवे साहेब,सौ. व श्री.संभुस साहेब, श्री.निकाळे सर, श्री. आहेर साहेब, श्री. बागवान सर , श्री. भगवान सरोदे साहेब , श्री. चौधरी साहेब, श्री कुलकर्णी साहेब, श्री टकले साहेब,श्री.घोरपडे साहेब व मावशी, खोब्रगाडे मावशी, सौ.जगधणेताई , अडव्होकेट सौ. खर्डे मॅडम, श्री. देशमुख साहेब , श्री मोहन आव्हाड, श्री श्रीकांत देशमुख साहेब, श्री.नितीन चित्ते साहेब, श्री. नितीन शिरसागर ,श्री राजेंद्र पंडित सर, श्री रूपवते सर, श्री देठे सर श्री लामखेडे काका,
श्री शेलार सर, श्री दीपक कदम व इतर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील उबाळे सर यांनी केले व आभार श्री. किरण खंडागळे, श्री. बबन शेलार व श्री. निकाळे सर यांनी मांनले.चहा व नाष्टा देवून या कार्यक्रमाची सांगता झाली.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.